प्रदीप नथ्थू खेवले (३९) रा. वडधा ता. आरमाेरी असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. प्रदीप याने फेसबुकवर मुलीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले हाेते. या अकाऊंटवरून तो मुलांशी मैत्री करीत हाेता. समाेरच्या व्यक्तीसाेबत मुलीप्रमाणेच चॅटिंग करीत हाेता. याच दरम्यान ता. समाेरच्या व्यक्तीला अश्लील व्हिडिओ काढायला सांगत हाेता. हा व्हिडिओ प्रदीप ऑनलाईन रेकाॅर्ड करून ठेवत हाेता व साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत हाेता. यामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीने आरमाेरी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सायबर विभागाने या तक्रारीचे तांत्रिक विश्लेषण करून आराेपीविराेधात गुन्हा दाखल केला तसेच आराेपीला मंगळवारी अटक केली. सायबर विभागाचे पाेलीस निरीक्षक गाैरव गावंडे, पाेलीस उपनिरिक्षक नीलेश ठाकरे, पाेलीस हवालदार मेश्राम, नैताम, राेहनकर यांच्या पथकाने हा तपास केला. आराेपीकडे आणखी काही नागरिकांचे व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना याबाबतची शंका आहे त्यांनी पाेलीस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाॅक्स
व्हाॅट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासाख्या साेशल मीडियावरील आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये. साेशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी असे आवाहन सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे. आपली फसवणूक झाली असल्यास सायबर पाेलीस स्टेशन ०७१३२-२२२१६३, पाेलीस नियंत्रण कक्ष ०७१३२-२२३१४९, ०७१३२-२२३१४२ या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.