२२५ मजुरांना मिळाले काम : १४ लाख ६८ हजारांचा निधी उपलब्ध शहर प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत इटियाडोह प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अरसोडा येथील मायनर क्रमांक १ व २ च्या नूतनीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर यांंच्या हस्ते करण्यात आले. कालव्याचे नूतनीकरण व मजबुतीकरण कामाकरिता १४ लाख ६८ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामावर २२५ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कालव्याच्या भूमिपूजन प्रसंगी पं. स. उपसभापती यशवंत सुरपाम, वैैनगंगा पाणी वापर संस्थेच्या अध्यक्ष संगीता भोयर, ग्रा. पं. सदस्य गोपाळ पगाडे, अशोक भोयर, अरसोडा येथील नागरिक व मजूर उपस्थित होते. अरसोडा येथे मायनरच्या कामामुळे गावातील अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
अरसोडात कालव्याचे भूमिपूजन
By admin | Published: May 06, 2017 1:27 AM