आशिष अग्रवाल हे समितीच्या माध्यमातून आरोग्य, पाणी, वीज, दुष्काळ, रस्ते, नेटवर्क अशा विविध समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. गरजू लोकांच्या मदतीला नेहमी धावून येणाऱ्या आशिष अग्रवाल यांची सामाजिक कार्यकर्ते म्हणून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
४ महिन्यांपूर्वी आशिष अग्रवाल यांना ‘समाजसेवा रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मागील वर्षी त्यांना सांगली व तहसील कार्यालय कोरची येथे सुद्धा ‘उत्कृष्ट समाजसेवक’ या पुरस्काराने सन्मनित करण्यात आले आहे. अग्रवाल यांनी आपल्या या पुरस्काराचे श्रेय आपले समितीचे सर्व पदाधिकारी, मित्र व परिवाराच्या सर्व सदस्यांना दिले असून आपले समाजसेवेचे कार्य असेच निरंतर सुरू राहील, असे प्रतिपादन आशिष अग्रवाल यांनी केले आहे.