चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी दाेन वर्षांतून एकदा तीन गणवेश देण्याची तरतूद आहे. परंतु चार वर्षांचा कालावधी उलटूनही गणवेश देण्यात आले नाहीत. रजा असतानाही रजा मंजूर न करता वेतन कपात करण्यात आली. किरकाेळ कारणांमुळे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ राेखली जाते. त्यामुळे प्रकल्पातील सर्व चतुर्थ कर्मचाऱ्यांमध्ये राेष आहे. मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संघटना बळकळ करावी, असे आवाहन प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केले. याप्रसंगी अहेरी प्रकल्पातील कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी युवराज कुमरे, उपाध्यक्ष अनिता पाेरेड्डीवार, जी. एस. मडावी, सचिवपदी आर. आर. अग्गुवार, सहसचिव ए. एस. नराेटे, एम. बी. बाेरकर, काेषाध्यक्ष आर. एस. भलावी यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर खांडरे यांनी केले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी समस्याग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:36 AM