लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भूत-पिशाच्च असल्याच्या अफवेमुळे भयग्रस्त झालेले सर्व विद्यार्थी आपल्या पालकांसोबत घरचा रस्ता धरल्याने प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.भयग्रस्त विद्यार्थ्यांनी प्रभारी मुख्याध्यापक भुरे यांना घरी जाण्याची सुुटी मागिली. सुरूवातीला भुरे यांनी सुटी देण्यास विरोध केला. परंतु स्थानिक पदाधिकारी, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना घरी सोडण्यास दबाव आणल्याने प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाने नाईलाजाने विद्यार्थ्यांना घरी जाऊ दिले.विश्वसनिय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार सदर आश्रमशाळेत भूत-पिशाच्च असल्याची अफवा पसरली. काही मुलांच्या अंगात भूत येत असल्याचे संशयास्पद लक्षण दिसल्याची कूजबूज सुरू झाली. यामुळे शालेय प्रशासनात खळबळ माजली. परिणामी आश्रमशाळा परिसरात भितीचे वातावरणही निर्माण झाले.सदर गंभीर बाब प्रकल्प कार्यालयाच्या प्रशासनास कळविण्यात आली. दरम्यान रविवारी सदर आश्रमशाळेला गडचिरोली प्रकल्प कार्यालयातील दोन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष घटनेची वस्तूस्थिती जाणून घेतल्याचे समजते. कोटगूलच्या शासकीय आश्रमशाळेत एकही विद्यार्थी आता उपस्थित नसल्याने सदर भूत-पिशाच्चच्या घटनेने गंभीर स्वरूप धारण केल्याचे दिसून येत आहे.काही पालकांनी पुजाºयाशी संपर्क साधून भूत-पिशाच्च बाधा काढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आश्रमशाळा परिसरात आहे. कोटगूल येथील शासकीय आश्रमशाळेतील या घटनेने जिल्हा प्रशासनासह आदिवासी विकास विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात अंधश्रध्दा निर्माण करणाºया घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे झाले आहे. विशेष करून आश्रमशाळेत विद्यार्थी निवासाने राहत असल्याने प्रकल्प कार्यालय प्रशासनाला याबाबत सतर्क राहून घटनेची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थी घरी परतल्यानंतर प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी सदर आश्रमशाळेत दाखल झाले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमक्ष शालेय प्रशासनाने पालकांची समजूत घातली असती तर प्रकरणावर तोडगा निघाला असता. विद्यार्थी आश्रमशाळेत राहिले असते.उपाय शोधण्यावर झाला विचार विनिमयभुताटकीच्या अफवेने कोटगूलची शासकीय आश्रमशाळा विद्यार्थ्यांविना रिकामी झाल्यानंतर काही पालकांनी २१ जुलै रोजी रविवारला सदर शाळेला भेट दिली. यावेळी शालेय प्रशासनासोबत त्यांची चर्चा झाली. सदर घटनेबाबत काही उपाय शोधण्यावर यावेळी विचार विनिमय करण्यात आला. सदर आश्रमशाळेत शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जोपर्यंत येथे नियमित शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत नाही. तोपर्यंत आम्ही पाल्यांना सदर आश्रमशाळेत पाठविणार नाही, असा निर्धारही केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, पालक व शाळा व्यवस्थापनात बराच वेळ चर्चा झाली.आश्रमशाळेत मुख्याध्यापकांसह १३ पदे रिक्तगडचिरोली प्रकल्पांतर्गत असलेल्या कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षकांसह कर्मचाºयांची एकूण १३ पदे रिक्त आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षकांची चारही पदे रिक्त आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षकांचे एक, प्राथमिक शिक्षकांचे चार, कनिष्ठ लिपीक एक, कामाठी दोन, चौकीदार एक आदींचा समावेश आहे. सदर आश्रमशाळेत एकूण २७ पदे मंजूर आहेत. यापैकी १४ पदे भरण्यात आली असून गेल्या पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. गडचिरोली प्रकल्पांतर्गत सात तालुक्यात एकूण २४ शासकीय आश्रमशाळा आहेत. मात्र बहुतांश आश्रमशाळा गावाच्या बाहेर जंगलालगत आहेत. सदर आश्रमशाळांमध्ये गेल्या काही वर्षापासून शिक्षक व कर्मचाºयांची नियमित पदे भरण्यात आली नाही. परिणामी कोटगूलच्या आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षापासून तासिका तत्वावरील मानधन शिक्षकांवरच काम चालवून घेतले जात आहे. नियमित शिक्षक शहरालगतच्या आश्रमशाळांमध्ये ठाण मांडून बसत असतात.
भुताटकीच्या अफवेने आश्रमशाळा झाली रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:47 PM
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भूत-पिशाच्च असल्याच्या अफवेमुळे भयग्रस्त झालेले सर्व विद्यार्थी आपल्या पालकांसोबत घरचा रस्ता धरल्याने प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
ठळक मुद्देसर्व विद्यार्थी गावाकडे परतले : प्रशासनात खळबळ