शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

रिक्त पदांनी आष्टीचे रुग्णालय आजारी

By admin | Published: May 19, 2016 1:13 AM

चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील जवळपास ३५ ते ४० नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने आष्टी येथे ग्रामीण रूग्णालय सुरू करण्यात आले.

डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची १२ पदे रिक्त : ३५ हजार नागरिकांच्या आरोग्याशी सुरू आहे खेळआष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील जवळपास ३५ ते ४० नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने आष्टी येथे ग्रामीण रूग्णालय सुरू करण्यात आले. मात्र या रूग्णालयात वर्ग १ चे वैद्यकीय अधीक्षक, वर्ग २ चे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण १२ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे कार्यरत डॉ. व कर्मचारी रूग्णसंख्येच्या तुलनेत सेवेसाठी कमी पडत आहेत. परिणामी आष्टी ग्रामीण रूग्णालयाची आरोग्य सेवा प्रचंड अस्थिपंजर झाली असल्याचे दिसून येत आहे. आष्टी भागात आरोग्याच्या शासकीय सुविधा नाहीत. शिवाय खासगी आरोग्यसेवाही उपलब्ध नाही. त्यामुळे आष्टी भागातील ३५ ते ४० हजार नागरिक आरोग्य सुविधेसाठी याच रूग्णालयात येतात. मात्र या ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे येथे आलेल्या रूग्णांवर वेळेवर पुरेसा औषधोपचा होत नाही. परिणामी येथे आलेल्या अनेक रूग्णांना चामोर्शी, तसेच गडचिरोलीचे जिल्हा सामान्य रूग्णालय गाठावे लागते. यामुळे बहुतांश रूग्णांवर प्रवासापोटी आर्थिक भुर्दंड बसतो. आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांची एक, डॉक्टरांची दोन, औषध निर्माण अधिकारी एक, क्ष-किरण तंत्रज्ञ एक, सहायक अधीक्षक एक, कनिष्ठ लिपीक दोन, कक्ष सेवक तीन, सफाई कामगार एक अशी एकूण १२ पदे वर्षभरापासून रिक्त आहेत. रिक्त पदासंदर्भात अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यात. मात्र जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने येथे रिक्त पदे भरण्याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आष्टी भागातील नागरिकांनी आरोग्य विभागाप्रती प्रचंड रोष व्यक्त केला आहे. राज्य शासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्यकडे लक्ष देऊन आष्टीच्या रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. आष्टी ग्रामीण रुग्णालयासारखीच जिल्हाभरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाची स्थिती आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवाही रिक्तपदांमुळे कोलमडली आहे. (प्रतिनिधी)