शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अटलजींच्या जाहीर सभेने गाठला होता गर्दीचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:42 PM

ओजस्वी वक्ते, संवेदशील कवी आणि अजातशत्रू नेता म्हणून देशावर आपली छाप पाडणारे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ भाजप नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने गडचिरोलीवासीयांच्या ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या.

ठळक मुद्देदोन वेळा गडचिरोलीत सभा : पक्षनिधी म्हणून कार्यकर्त्यांनी दिली होती ३० हजार रुपयांची थैली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ओजस्वी वक्ते, संवेदशील कवी आणि अजातशत्रू नेता म्हणून देशावर आपली छाप पाडणारे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ भाजप नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने गडचिरोलीवासीयांच्या ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. राजकीय कारकिर्दीत दोन वेळा गडचिरोलीत जाहीर सभा घेणाऱ्या अटलजींची दुसरी सभा तर गडचिरोलीचा अनेक वर्षातील गर्दीचा उच्चांक गाठणारी ठरली. गुरूवारी सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.अटलजींची गडचिरोलीतील पहिली सभा १९८५ च्या सुमारास झाली होती. त्यावेळी ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. इंदिरा गांधी चौकातील श्याम टॉकीजच्या बाजुला असलेल्या खुल्या जागेवर ती जाहीर सभा झाली होती. त्यावेळी पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांच्या वतीने जमा करण्यात आलेल्या ३० हजार रुपयांच्या निधीची थैली आणि तलवार त्यांना भेट देण्यात आली होती.दुसरी जाहीर सभा १९९६ मध्ये झाली. ही सभा वसंत विद्यालयाच्या पाठीमागच्या मैदानावर झाली होती. त्यावेळी राज्यात जेमतेम भाजप-सेनेचे युती सरकार सत्तेवर आले होते. महाराष्ट्राप्रमाणे केंद्रातही भाजपचा झेंडा फडकवण्याचा संकल्प करीत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी झंझावती दौऱ्यावर निघाले होते. आज गडचिरोलीवासियांसाठी हेलिकॉप्टरचे दर्शन रोजचेच झाले असले तरी त्यावेळी अटलजींचे हेलिकॉप्टर शहरवासियांचे अप्रुप होते. राज्य मंत्रीमंडळातील तत्कालीन मंत्री नितीन गडकरी, शोभाताई फडणवीस यांच्यासह अ‍ॅड.दादाजी देशकर, लोकसभेचे उमेदवार विलास कोडाप, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत जंबेवार, बाबुराव कोहळे आदी मंचावर विराजमान होते.विरोधी पक्षनेते म्हणून लोकसभेत आपली छाप पाडणाºया अटलजींना ऐकण्यासाठी त्यावेळी गडचिरोली शहरासह जिल्हाभरातून लोक जमले होते. समर्थ यांच्या घरापासून तर आताच्या महिला रुग्णालयापर्यंत लोक सभेत बसले होते. त्यावेळी त्या भागात आतासारखी दुकाने, वॉल कंपाऊंड काहीही नव्हते. त्यामुळे धानोरा मार्गापर्यंत सर्व भाग मोकळा होता. त्या सभेत जिल्हा भाजपच्या वतीने अटलजींना ५ लाख रुपयांची थैली पक्षकार्यासाठी भेट देण्यात आली होती. त्या निवडणुकीनंतरच अटलजी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यानंतरही त्यांनी गडचिरोलीशी ऋणानुबंध कायम ठेवले.कवितेची दखल१९९६ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अटलजी पंतप्रधान झाले. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी त्यांनी श्रीनगर ते लाहोर ही बस सुरू केली होती. त्यावर आधारित ‘शांती का संदेश’ ही कविता भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत जंबेवार यांचे वडील आणि व्यवसायाने शिक्षक तथा कवी असलेले मधुकर जंबेवार यांनी आपल्या ‘मधुरांगन’ या हिंदी कवितासंग्रहात प्रकाशित केली होती. त्याची प्रत अटलजींना पाठविल्यानंतर त्यांनी आपल्या खासगी सचिवामार्फत जंबेवार यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानून आपल्यातील सहृदयी व्यक्तिमत्त्वाचा परिचय दिला.कार्यकर्त्यांची प्रार्थनाअटलजींची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी गडचिरोली शहरालगतच्या सेमाना देवस्थान येथे प्रार्थना केली. यावेळी भारत खटी, दामोदर अरगेला, अनिल पोहनकर, प्रकाश अर्जुनवार, नंदू काबरा, अनिल कुनघाडकर, अविनाश महाजन, आनंद श्रृंगारपवार, विनोद देवोजवार, अंकित हेमके, डेडुजी राऊत आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा