लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बँकांच्या एटीएममध्ये जंतूसंसर्गाबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता असल्याबद्दलचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर अनेक नागरिक सतर्क झाले. मास्क लावून येणाऱ्यांचे प्रमाण काही अंशी वाढले, पण एटीएममधील परिस्थिती मात्र गुरूवारीही पूर्वीप्रमाणेच कायम होती. एटीएममध्ये उद्यापासून सॅनिटायझर ठेवणार, असे सांगणाऱ्या बँकांनी, किंवा जंतूसंसर्गाचे नियम पाळले नाही म्हणून प्रशासनाच्या वतीने कोणावरही कारवाई झाली नाही.प्रशासनाच्या नियमानुसार ई-पास न काढताच जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. याशिवाय रेड झोनमधून येताना ई-पास काढून आल्यानंतरही योग्य ती खबरदारी न घेता समाजात बिनधास्तपणे वावरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परंतू प्रशासनाने कारवाईचा फास आवळला नसल्यामुळे असे लोक कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. बँकांच्या एटीएममधील बटनांना दिवसभरात शेकडो लोक स्पर्श करतात. त्यात एखादी कोरोनाबाधित व्यक्ती असल्यास अनेकांना नाहक कोरोनाबाधित व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एटीएमचा वापर करण्याआधी हाताच्या बोटांना सॅनिटायझर लावणे गरजेचे आहे. त्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था संबंधित बँकांनी करणे अपेक्षित आहे. परंतू लोकमतने याबाबतचे गांभिर्य लक्षात आणून दिल्यानंतरही बँका आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा त्याबाबत गंभीर दिसत नसल्यामुळे नागरिकांमधील बिनधास्तपणा यापुढे आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने दररोज एटीएम मध्ये जाणाºयांची संख्या वाढणार आहे. सॅनिटायझरचा वापर न झाल्यास शेकडो नागरिक कोरोना संसर्गबाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एटीएममधील परिस्थिती ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 5:00 AM
प्रशासनाच्या नियमानुसार ई-पास न काढताच जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. याशिवाय रेड झोनमधून येताना ई-पास काढून आल्यानंतरही योग्य ती खबरदारी न घेता समाजात बिनधास्तपणे वावरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परंतू प्रशासनाने कारवाईचा फास आवळला नसल्यामुळे असे लोक कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. बँकांच्या एटीएममधील बटनांना दिवसभरात शेकडो लोक स्पर्श करतात.
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : राष्ट्रीयीकृत बँकांकडून नियमांना तिलांजली