आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदिरा गांधी चौकात राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करीत शासनाच्या धोरणांवर टीका केली. मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला सादर केले.गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून एकरी १० हजार रूपयांची मदत द्यावी, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ नियंत्रीत करावी, पेट्रोल, डिझेल, गॅसची भाववाढ थांबवावी, अल्पसंख्यांकांना पाच टक्के आरक्षण द्यावे, महिला व बाल रूग्णालयाला आर. आर. पाटील यांचे नाव द्यावे, फसलेली नोटबंदी व जीएसटीवर फेरविचार करावा आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांना दिले.आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला अध्यक्ष सोनाली पुण्यपवार, युवक अध्यक्ष प्रा. रिंकू पापडकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, विनायक झरकर, मुस्ताफ शेख, मनिषा खेवले, फहीम काझी, विजय कावळे, विवेक बाबणवाडे, तुकाराम पुरणवार, विजय धकाते, अजय कुंभारे, कबीर शेख, इसराईल शेख, जितू मुपीडवार, बरकत सय्यद, शबीर शेख, गुमानसिंग, सुंदरसिंग, विजय चंदुलवार, राजू डांगेवार, ममता चिलबुले, संजय कोवे, दिपाली गिरडकर, मनिषा सजनपवार, यामिनी फुलसंगे, संगीता कवळे, माया खेवले, मोरेश्वर भांडेकर यांच्यासह रॉकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा शासनाविरोधात हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 10:53 PM