लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : किशोर बलवंत मेश्राम यांच्यावर एक महिन्यापूर्वी प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात आपला अजिबात समावेश नाही. किशोर मेश्राम यांच्यासोबत असलेल्या राजकीय वादातून त्यांनी आपले नाव सांगितले व पोलिसांनी आपल्याला अटक केली. आपल्या विरोधात वर्तमान पत्रांमध्ये मानहानीकारक बातम्या छापून आल्या आहेत. त्यामुळे किशोर मेश्राम यांच्यावर मानहानीची केस टाकण्यात आली आहे, अशी माहिती क्षितीज उके यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.मागील १० वर्षांपासून आजतागायत ग्रामपंचायतीचा मी सदस्य आहे. कोणासोबतही आजपर्यंत वाद किंवा भांडण केले नाही. किशोर मेश्राम सोबत राजकीय वाद असल्याने त्यांनी कुरूड येथील काही महिलांना माझ्या विरोधात भडकावून माझ्या नावाची खोटी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करायला लावली. कुरूड येथे गाव विकास समिती अस्तित्वात नसताना सुध्दा मला बदनाम करण्याचा कट रचून गाव विकास समितीच्या नावावर बातम्या प्रकाशित केल्या. कुरूड ग्रामपंचायत अंतर्गत नाल्या उपसा करण्याचे काम सरपंच यांच्या परवानगीने बंद करण्यात आले होते. काही महिलांनी आपल्यासोबत हुज्जत घालून किशोर मेश्राम यांच्या घरून सबल आणून माझ्या घरासमोरील फरशी तोडण्याचा प्रयत्न केला. हे सर्व काम किशोर मेश्राम यांच्या चितावनीवरून सुरू होते. किशोर मेश्राम हेच वाद उकरून काढत होते. मेश्राम यांच्यावर हल्ला झाला. त्यामध्ये आपला समावेश नाही. मात्र राजकीय वादातून या प्रकरणात आपल्याल अडकविण्यात आले आहे, असा खुलासा क्षितीज उके यांनी केला आहे.
‘त्या’ हल्ल्यात आपला समावेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:55 PM
किशोर बलवंत मेश्राम यांच्यावर एक महिन्यापूर्वी प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात आपला अजिबात समावेश नाही.
ठळक मुद्देक्षितीज उके यांचा दावा : किशोर मेश्राम यांच्यावर मानहानीचा दावा