आॅनलाईन लोकमतगडचिरोली : ओबीसींना विविध योजनांपासून दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हा अन्याय आता सहन करण्याच्या पलिकडे झाला असून या अन्यायाविरोधात ओबीसी जनमत तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल विभागातर्फे रथ अभियान चालविले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलच्या मदतीनेही जागृती केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी दिली.विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. महिलांना नॉन क्रिमीलेअरची जाचक अट घातली आहे. देशात १ हजार ६०० ओबीसी विद्यार्थी आयएएस झाले. परंतु नॉन क्रिमीलेअरच्या अटीमुळे त्यांना बाद ठरविले आहे. हा एक प्रकारचा ओबीसींवर अन्याय असून या अन्यायाला वाचा फोडण्याबरोबरच मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करावे, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रूपयांचे भांडवल द्यावे, नॉन क्रिमीलेअरची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी ओबीसी रथ अभियान सुरू करण्यात आले आहे. सदर रथ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथे रथ अभियानाचा समारोप केला जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील २०० कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती राकाँ ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी दिली.यावेळी राकॉचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सोनाली पुण्यपवार, वामनराव झाडे, विनायक झरकर, प्रकाश ताकसांडे, जगण जांभुळकर, सुलोचना मडावी, फहीम काजी, मुस्ताक शेख, संजय कोचे, प्रभाकर बारापात्रे, बरखत सय्यद, विवेक बाबनवाडे, विवेक सहारे, कबीर शेख, जगनसिंह पटवा, मनिषा खेवले, मनिषा सजन पवार उपस्थित होते.
ओबीसींचा विकास खुंटविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:39 PM
ओबीसींना विविध योजनांपासून दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हा अन्याय आता सहन करण्याच्या पलिकडे झाला असून या अन्यायाविरोधात ओबीसी जनमत तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल विभागातर्फे रथ अभियान चालविले जात आहे.
ठळक मुद्देईश्वर बाळबुद्धे यांचा आरोप : जागृतीसाठी ओबीसी रथ अभियानाला सुरूवात