लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नदीच्या त्रिवेणी संगमावर सागवानी लाकडाची विश्रामगृहाची इमारत आहे. सदर इमारत भामरागड तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.१९६४ साली एका वनाधिकाऱ्याने पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नदीच्या त्रिवेणी संगमावर सागवानी लाकडांचे विश्रामगृह उभारले होते. कालांतराने या लाकडाच्या विश्रामगृहाला उदळी लागली. देखभाल असूनही या विश्रामगृहाच्या लाकडांची मोठी पडझड झाली होती. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाने दोन वर्षांपूर्वी सागवानी लाकडांचेच नवीन विश्रामगृह बांधले आहे.आलापल्लीच्या ज्या कारागिराने जुन्या विश्रामगृहाची उभारणी केली होती. त्यांच्याच वंशजांकडून नव्या विश्रामगृहाच्या उभारणीचे काम करण्यात आले. लाकडाचे हे विश्रामगृह उकलून नव्याने बांधणीच्या कामापूर्वी प्रत्येक बाबीचे छायाचित्रण करण्यात आले होते. तसेच नकाशेही तयार करण्यात आले होते. त्याच धरतीवर पुन्हा नव्या विश्रामगृहाची उभारणी करण्यात आली आहे.या परिसरात आता बालोद्यानातही उभारण्यात आले असून नव्या विश्रामगृहाने कात टाकल्यामुळे पर्यटकांचेही पावले इकडे आता वळले आहेत. वनपर्यटनाचे महत्त्व वाढत चालले असल्याने भामरागड तालुक्याला भेट देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. भामरागड येथील केवळ सागवानी लाकडांपासून बनलेले हे विश्रामगृह पर्यटकांसाठी कौतुकाचा विषय असल्याने भामरागडला आलेला प्रत्येक पर्यटक या विश्रामगृहाला भेट देऊन सौंदर्य न्याह्याळतोे. सदर विश्रामगृह त्रिवेणी संगमावर निसर्गरम्य वातावरणात उभारण्यात आले आहे. येथील निसर्गही पर्यटकांना आकर्षित करीत आहे.
लाकडी विश्रामगृहाचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:05 AM
पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नदीच्या त्रिवेणी संगमावर सागवानी लाकडाची विश्रामगृहाची इमारत आहे. सदर इमारत भामरागड तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
ठळक मुद्देभामरागडातील वास्तू : वनपर्यटकांची संख्या वाढतीवर