बैैल कोंडवाड्यातच : कुरखेडा नगरपंचायतीतील प्रकारकुरखेडा : कुरखेडा येथील कोंडवाड्यात मागील चार- पाच महिन्यांपासून एक पांढरा शिंगरा बैल अतिशय दैयनिय अवस्थेत चारापाण्याविना जगत आहे. परंतु नगर पंचायत प्रशासनाने या बैलाचा लिलावही केलेला नाही. २१ दिवसांत लिलाव प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तशी निविदाही नगर पंचायतीने काढली होती. परंतु संपूर्ण लोकांना लिलाव प्रक्रियेची माहिती न झाल्याने ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली. तेव्हापासून चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु अजुनही या बैलाचा लिलाव करण्यात आला नाही. या बैलाला एकदा चारा टाकल्यानंतर चार- पाच दिवस त्याच्याकडे कुणीही जाऊन पाहत नाही त्यामुळे त्याला पाणीही मिळत नाही. बैलाची स्थिती अतिशय दैयनिय झाली आहे. (शहर प्रतिनिधी)नगर पालिकेचे मुख्य अधिकारी सध्या बाहेर आहेत. त्यामुळे बैैल लिलाव प्रक्रियेची निविदा काढण्यात आलेली नाही. येत्या पंधरा दिवसांत लिलाव प्रक्रियेची निविदा काढून बैल लिलावातून विकला जाईल. - डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, नगराध्यक्ष, नगर पंचायत कुरखेडा
चार महिन्यांपासून लिलाव रखडला
By admin | Published: October 09, 2016 1:42 AM