तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी गोळाबेरीज करीत आहे. पार्टी पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांचा गट तयार करून निवडणुका लढविल्या होत्या. ग्रामपंचायतीवर आविसंचे वर्चस्व राहणार आहे तर रा.काॅ. दुसऱ्या तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप एक किंवा दोन ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे एकाही ग्रामपंचायतीची सत्ता येण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, ३० ग्रामपंचायतींपैकी १६ वर अनुसूचित जमाती महिला तर १४ ग्रामपंचयतीवर अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) उमेदवार सरपंचपदी विराजमान होणार आहेत. एकूणच ग्रामपंचायतीवर महिलाराज राहणार आहे.
बहुतांश ग्रामपंचायतींवर आविसंच्या वर्चस्वाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:34 AM