लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्च संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना आॅर्गनायझेशन आॅफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स आॅफ इंडियाच्या वतीने लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ११ आॅक्टोबर रोजी मुंबईला सदर पुरस्कार दिला जाणार आहे.१९८६ पासून डॉ. बंग दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यात सर्च संस्थेच्या माध्यमातून बालमृत्यू, ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या, आरोग्यशिक्षण, आरोग्याच्या प्रश्नावर संशोधन, व्यसनमुक्ती आदी विषयांवर व्यापक कार्य करीत आहे. राष्ट्रीय-आंतरराष्टीय पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील १३४ गावांना सर्च संस्थेद्वारे आरोग्यसेवा दिली जात आहे. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत दोघांनाही लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. रोगांपासून लोकांचे संरक्षण कारण्यासाठी ‘ओफ्पी’ अनेक वर्षांपासून काम करीत आहे.
बंग दाम्पत्यांना पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:58 AM
आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्च संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना आॅर्गनायझेशन आॅफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स आॅफ इंडियाच्या वतीने लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
ठळक मुद्देकार्याची दखल : मुंबईत होणार सन्मान