लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद गडचिरोलीच्या वतीने तब्बल १५ वर्षानंतर प्रथमच शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर परिषद शाळांच्या १४ शिक्षकांना सेवा सन्मान उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गुरूवारी सन्मानित करण्यात आले. दरम्यान न.प. शाळेच्या शिक्षकांनी विविध कौशल्याचा वापर करून दर्जेदार गुणवत्तापूर्ण व सक्षम विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी यावेळी केले.सदर शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.प. उच्च प्राथमिक शाळा संकूल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर ठाकरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मधुकर नैताम, केंद्रप्रमुख राधेश्याम भोयर, शिक्षण विभागाचे लिपीक ताकसांडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केलेल्या न.प. शाळेच्या एकूण १४ शिक्षकांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये डॉ.आंबेडकर शाळेच्या मुख्याध्यापक मंगला रामटेके, शिक्षिका संध्या चिलमवार, वीर बाबुराव शेडमाके शाळेचे मुख्याध्यापक राधेश्याम भोयर, शिक्षिका निशा चावरे, जवाहरलाल नेहरू शाळेचे शिक्षक महेंद्र शेडमाके, शर्मिला मने, सुधीर गोहणे, सावित्रीबाई फुले शाळेच्या शिक्षिका माधुरी मस्के, म.गांधी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा साळवे, राजीव गांधी शाळेच्या शिक्षिका नयना चन्नावार, शिवाजी शाळेचे शिक्षक राजेश दरेकर, संत जगनाडे महाराज शाळेचे शिक्षक रवींद्र पटले, इंदिरा गांधी शाळेचे शिक्षक प्रमोद भानारकर, रामपुरी शाळेचे शिक्षक कांतीलाल साखरे आदींचा समावेश आहे.पुढे बोलताना नगराध्यक्ष योगीता पिपरे म्हणाल्या, न.प.शाळांचा विकास व भौतिक सुविधा तसेच गुणवत्ता वाढीसाठी आपण प्रयत्न करू तसेच नगर परिषद शाळेतून शिकलेला विद्यार्थी कुठेही स्पर्धेत कमी पडू नये, अशी व्यवस्था शाळांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असा मानस त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनीही न.प.शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगला रामटेके, संचालन संध्या चिलमवार यांनी केले. कार्यक्रमाला नगर परिषदेच्या सर्व १० शाळांचे शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.शिक्षण सभापतींसह २२ नगरसेवकांनी फिरविली पाठसन २००३ मध्ये नगर परिषदेचे शिक्षण सभापती म्हणून प्रकाश ताकसांडे पदावर होते. त्यावेळी नगर परिषदेच्या वतीने उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर १५ वर्ष शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला नाही. यंदाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नियोजन आठवडाभरापूर्वी ठरले होते. मात्र या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, शिक्षण सभापती वर्षा बट्टे यांच्यासह न.प.च्या शिक्षण समितीचे सर्व सहा सदस्य अनुपस्थित होते. तसेच पाणीपुरवठा सभापती वगळता एकही नगरसेवकाने या कार्यक्रमात हजेरी लावली नाही. बुधवारच्या सर्वसाधारण सभेप्रमाणे आजच्या शिक्षक दिनानिमित्त होणाºया पुरस्कार वितरण कार्यक्रमावरही आम्हा सर्वांचा बहिष्कार आहे, अशी माहिती शिक्षण सभापती वर्षा बट्टे यांनी लोकमतशी बोलताना दिली. बहिष्काराच्या या नाट्यमय घडामोडीची चर्चा आहे.जीवनात शिक्षकांचे मोलाचे स्थान-ओहोळमला शिक्षक व्हावे, असे कधी वाटले नाही. तसा विचारही मी केला नाही. मात्र शिक्षकांप्रती माझ्या मनात विद्यार्थीदशेपासूनच प्रचंड आदर आहे. सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान हे अतिशय मोलाचे व महत्त्वपूर्ण आहे. असे प्रतिपादन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी केले.
न.प.च्या १४ शिक्षकांचा उत्कृष्ट पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 6:00 AM
सदर शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.प. उच्च प्राथमिक शाळा संकूल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिपरे होत्या.
ठळक मुद्दे१५ वर्षानंतर समारंभ : सक्षम विद्यार्थी घडविण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन