आरमाेरी : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालय व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आरमाेरी येथील बाइक रॅली काढून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. प्रा. जयेश पापडकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीस सुरुवात केली. त्यानंतर विविध प्रकारच्या घाेषणा देत व फलकांचे प्रदर्शन करत शहरातील विविध भागांतून रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला. रॅलीच्या शेवटी रासेयाेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सतेंद्र साेनटक्के व डाॅ. राजेंद्र कढव यांनी आभार मानले.
२ ते ८ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा शुभारंभ आरमाेरी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा, शिक्षण मंडळाचे सदस्य मयूर वनमाळी, निरीक्षक चेतन पाटील, प्रभाकर सावंत, अनिल साेमनकर, उपप्राचार्य डाॅ. चंद्रकांत डाेर्लीकर, प्रा. नाेमेश मेश्राम उपस्थित हाेते. याप्रसंगी रवींद्र भुयार व सुवर्णपदकप्राप्त भाग्यश्री लांजेवार हिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन डाॅ. विजय रैवतकर यांनी केले.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने आरमाेरी येथे नवीन बसस्थानक परिसरात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती केली. पथनाट्याचे नेतृत्व प्रियंका ठाकरे यांनी केले. संचालन प्रा. डाॅ. ज्ञानेश्वर ठाकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. जयेश पापडकर, सीमा नागदेवे, गजेंद्र कढव, राजेंद्र चव्हाण, वसंता कहालकर, गजानन बाेरकर, किशाेर वासुरके, पराग मेश्राम, विजय गाेरडे, अमिता बन्नाेरे, सतीश काेला, नरेश बन्साेड, सुनील चुटे, प्रशांत दडमल, किशाेर कुथे यांनी सहकार्य केले.