मेळाव्याचे उद्घाटन सरपंच नीलिमा मडावी यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रभारी अधिकारी पीएसआय सूर्यभान कदम हाेते. यावेळी पीएसआय प्रवीण पाथरकर, पी.बी. धकाते, रंजित राठोड, प्रेम शेडमाके उपस्थित होते. झिंगानूर उपपाेलीस स्टेशनच्या परिसरातील गावांमध्ये नक्षल अभियानादरम्यान जाऊन तेथील लाेकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. अनेक समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही लाेकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन प्रभारी अधिकारी सूर्यभान कदम यांनी केले. पी. बी. धकाते यांनी वनविभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध याेजनांची माहिती देण्यात आली. प्रवीण पाथरकर यांनी युवापिढीने शैक्षणिक प्रवाहात येऊन आपला विकास साधावा. आगामी पोलीस भर्तीमध्ये पोलीस स्टेशन परिसरातील आदिवासी युवकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. पाेलीस विभागामार्फत राबविले जाणारे प्रोजेक्ट प्रगती, प्रोजेक्ट विकास, बालसंगोपन योजना, अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, निराधार योजना अशा विविध योजनांची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली. मेळाव्यात नागरिकांनी अनेक समस्या व अडचणी मांडल्या. सदर समस्यांचा पाठपुरावा प्रशासनस्तरावर करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. कृषी मेळाव्यात विविध प्रकारची रोपे व जैविक औषधींचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लस देण्यात आली. मेळाव्याचे संचालन शिवप्रसाद करमे तर आभार पंडित मुंडे यांनी मानले.
दुर्गम भाागातील नागरिकांमध्ये याेजनांबाबत जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:25 AM