सिराेंचा तालुक्यातील विठ्ठलरावपेठा, माेयाबिनपेठा परिसरातील गावांमध्ये अधिकाऱ्यांनी भेट देऊन लसीकरणाचे फायदे सांगण्यात आले. संवर्ग विकास अधिकारी विकास घाेडे यांच्या नेतृत्वात सहायक प्रशासन अधिकारी बन्साेड, कृषी अधिकारी काेपनार, पांचाळ, पाेरटे, पंचायत विस्तार अधिकारी जी. बी. माकडे, जे. एस. वडालाकाेंडा, तालुका पेसा समन्वयक एस. आर. कडुकर, कनिष्ठ अभियंता नागरगाेजे, तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसचिव, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व आराेग्य कर्मचारी उपस्थित हाेते.
विशेष म्हणजे, विठ्ठलरावपेठा येथे निवासी राहून रात्री नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. सिराेंचा तालुक्यातील नरसिंहापल्ली, पर्सेवाडा, बेजुरपल्ली, काेटापल्ली, आरडा, रामंजापूर, नगरम, आसरअल्ली आदी गावांमध्ये काेराेना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती करण्यात आली.
080921\08gad_2_08092021_30.jpg
विठ्ठलरावपेठा येथे नागरिकांमध्ये जागृती करताना अधिकारी.