लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी येथील कर्मवीर दादासाहेब महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रासाठी प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाला नोटीस बजावून प्रवेश देण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रभारी कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.महाविद्यालय प्रशासनाने आतापर्यंत १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. मात्र अजूनही जवळपास ७० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी चामोर्शी वगळता दुसºया ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कर्मवीर दादासाहेब विद्यालयातच प्रवेश द्यावा, अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक हर्षल गेडाम, चेतन लिंगलवार, मयूर टेंभूर्णे, नगरविस्तार तेजस मोहतुरे व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
बी.ए. द्वितीय वर्षाला प्रवेश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:40 AM
चामोर्शी येथील कर्मवीर दादासाहेब महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रासाठी प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
ठळक मुद्देप्रभारी कुलगुरूंना निवेदन : के.डी.डी. महाविद्यालयाबाबत आक्षेप