लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी न्यायालय, शासन व प्रशासनाने यंदाच्या गणेशोत्सवात अनेक निर्बंध आणले. दरम्यान विसर्जनस्थळी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी नगर पालिका प्रशासनाने विसर्जनस्थळे वाढवावी, तसेच कृत्रिम तलाव निर्माण करावे, असे निर्देश देण्यात आले. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज व गडचिरोली या तिन्ही नगर पालिकेने कृत्रिम तलावाची निर्मिती केली नाही.गडचिरोली शहरात सिंचन विभागाच्या अखत्यारित येत असलेले पाच तलाव आहेत. यामध्ये फुले वार्डातील बोडी, भातगिरणीनजीकची बोडी, लांझेडा, इंदिरा नगर येथील तलाव तसेच आनंद नगर बायपास मार्गलगत असलेला छोटा तलाव आदींचा समावेश आहे. याशिवाय कठाणी नदीचे तीर आहे. सहा ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करणे शक्य झाले असते. मात्र गडचिरोली न.प. प्रशासनाने गोकुलनगर लगतचा तलाव वगळता इतर कोणत्याही ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली नाही. शिवाय एकही कृत्रिम तलाव निर्माण केला नाही.गडचिरोली जिल्हा मुख्यालय असल्याने येथे सार्वजनिक मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. शिवाय घरगुती गणेशमूर्तीची संख्या बरीच होती. या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन एकमेव गोकुलनगर लगतच्या तलावात केले जात आहे. पालिकेने येथे निर्माल्य संकलनासाठी कचराकुंडी, हातगाडी व पोहणारे लोक ठेवले आहेत. याशिवाय येथे मच्छीमार सोसायटीतर्फे चौकीदार कर्तव्यावर आहे. पोलीस बंदोबस्त आहे. १०० पेक्षा अधिक घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन याच तलावात करण्यात करण्यात आले. एकमेव तलाव असल्याने विसर्जनादरम्यान तलावाच्या पाळीवर व परिसरात भाविकांची बऱ्याचदा गर्दी झाल्याचे दिसून आले.आरमोरी, देसाईगंजातही नियमांचे उल्लंघनदेसाईगंज येथे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. न.प.च्या क्षेत्रात नैनपूर तलाव व वैनगंगा नदीवरील विर्शी घाट या दोनच ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था आहे. देसाईगंज न.प. प्रशासनाने एकाही कृत्रिम तलावाची निर्मिती केली नाही. तसेच विसर्जनासाठी इतर ठिकाणी व्यवस्था केली नाही.आरमोरी शहरात रामसागर तलाव व जोगीसाखरा नजीकचा तलाव या दोनच ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात आहे. आरमोरी पालिकेने कृत्रिम तलाव निर्मितीकडे पाठ फिरविली आहे.
कृत्रिम तलाव निर्मितीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 5:00 AM
गडचिरोली शहरात सिंचन विभागाच्या अखत्यारित येत असलेले पाच तलाव आहेत. यामध्ये फुले वार्डातील बोडी, भातगिरणीनजीकची बोडी, लांझेडा, इंदिरा नगर येथील तलाव तसेच आनंद नगर बायपास मार्गलगत असलेला छोटा तलाव आदींचा समावेश आहे. याशिवाय कठाणी नदीचे तीर आहे. सहा ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करणे शक्य झाले असते.
ठळक मुद्देमोजक्याच ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन : जिल्ह्यातील तिन्ही नगर पालिकेची उदासिनता