लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : मागासवर्गीयांच्या मतांवर सत्तेत येणारे राज्य करणारे राज्यकर्ते सत्तेचा गैरवापर करून मागासवर्गीयांचे संवैधानिक हक्क संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाबासाहेबांनी दिलेल्या मतदाधिकाराचा याेग्य वापर मागासवर्गीयांनी करावा, असे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याध्यक्ष अरुण गाडे यांनी केले.
आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने गडचिराेली येथील संविधान सभागृहात संवैधानिक आरक्षण आणि पदाेन्नतीमधील आरक्षणाबाबत केंद्र व राज्य शासनाची भूमिका या विषयावर आयाेजित व्याख्यानमालेत ते मार्गदर्शन करीत हाेते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर हाेते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. सुरेश माने, मुख्य संयाेजक गाैतम मेश्राम उपस्थित हाेते.
७ मे २०२१ राेजी राज्य शासनाने शासन निर्णय काढून मागासवर्गीयांचे पदाेन्नतीमधील आरक्षण संपुष्टात आणले आहे. याविराेधात लढा उभारण्यासाठी ४३ संघटना एकत्र येऊन राज्य आरक्षण हक्क कृती समिती गठित करण्यात आली आहे. अनेक आंदाेलने केली, मात्र शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे आता न्यायालयीन लढाई मजबूत करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या ‘वन वाेट, वन व्हॅल्यू’ या अधिकाराचा विचारपूर्वक व याेग्य वापर केला पाहिजे. तरच आपले संवैधानिक हक्क कायम राखू शकू, असे विचार गाडे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन अशाेक मांदाडे केले, तर आभार सदानंद ताराम यांनी मानले. यशस्वितेसाठी समितीचे सहसंयाेजक देवानंद फुलझेले, धर्मानंद मेश्राम, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय बन्साेड, देवेंद्र साेनपिपरे, राज बन्साेड, बंडू खाेब्रागडे, प्रतीक डांगे, नयना बन्साेड, श्याम रामटेके यांनी सहकार्य केले.