तहसीलदारांना निवेदन : ओबीसींना ५२ टक्के आरक्षण द्या! गडचिरोली : संविधानिक हक्क अधिकारांतर्गत ओबीसींना ५२ टक्के, एससीला १५ टक्के, एसटीला ७.५ टक्के व धार्मिक अल्पसंख्याकांना १०.५ टक्के प्रमाणे आरक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चा गडचिरोलीच्या तहसील कार्यालयावर १३ एप्रिल रोजी काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचे हबीबखॉ पठाण, ओबीसी संघर्ष कृती समितीचे अरूण पाटील मुनघाटे, आॅल इंडिया लॉयर असोसिएशनचे अॅड. राजकुमार थोरात, पुरूषोत्तम निकोडे यांनी केले. ओबीसींना लोकसंख्येच्या अनुपाताने ५२ टक्के आरक्षण देण्यात यावे, तसेच नॉन क्रिमीलेअरची असंविधानिक अट रद्द करण्यात यावी, असे मत अरूण मुनघाटे यांनी मानले. पुरूषोत्तम निकोडे यांनी आजपर्यंत ओबीसी वर्गावर शासनाकडून अन्याय झाला आहे. हक्क व अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले, असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रा. वंजारी यांनी मानले. नायब तहसीलदार खारकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.
बहुजनांचा मोर्चा तहसीलवर धडकला
By admin | Published: April 20, 2017 2:09 AM