लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील धान खरेदी केंद्रावरील ६३ लाख ८९ हजार रुपयांचे चुकारे शिल्लक आहेत. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरायचे असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.धानोरा येथील आदिवासी सोसायटीमार्फत धान खरेदी केली जाते. शासकीय गोदाम भरल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या मैदानात धानाची खरेदी करण्यात आली. या केंद्रावर धानोरा, सालेभट्टी, चव्हेला, पवनी, माळंदा, खरकाडी, कांदाडी, तुकूम, तोडे, हेटी या १० गावांतील शेतकऱ्यांनी धान विक्रीस आणला होता. यावर्षी धानाचे भरघोस उत्पादन झाले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाची आवक सुद्धा वाढली होती. धानोरा येथील धान खरेदी केंद्र १८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले. आतापर्यंत ४७५ शेतकऱ्यांचे १३ हजार २३७ क्विंटल धान खरेदी केले. त्यापैकी ३४० शेतकºयांच्या ९ हजार ७१७ क्विंटल धानाच्या हुंड्या काढण्यात आल्या. अजूनही १३५ शेतकºयांचे ६३ लाख ८९ हजार ३०८ रुपयांचा चुकारा देण्यात आला नाही.बहुतांश शेतकरी पीक कर्ज घेऊन धानाची विक्री करतात. पीक कर्ज बिनव्याजी उपलब्ध होते. मात्र त्यासाठी सदर कर्ज ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे. ३१ मार्च आता जवळ येत असल्याने कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. मात्र अजूनपर्यंत धानाचे चुकारे झाले नसल्याने कर्ज कसे भरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. व्याज सवलत योजनेचा लाभ घ्याचा असेल तर ३१ मार्चपूर्वीच कर्ज भरणे आवश्यक आहे.धानाचे चुकारे मिळेपर्यंत शेतकरी कुणाकडूनही उसणेवारी पैसे घेऊ शकला असता, मात्र शासनाने आता संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पैसे उसणेवारी घेण्याचे प्रयत्नही संपल्यागत आहे.३१ मार्चपर्यंत धान खरेदी राहणार बंदकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यशासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने ३१ मार्चपर्यंत धान खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश धान उघड्यावरच ठेवण्यात आले आहे. पाऊस आल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने या धानावर झाकण्यासाठी ताडपत्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. धानाची उचल करताना दुजाभाव केला जात आहे, असा आरोप सोसायटीच्या संचालकांनी केला आहे.
६४ लाखांचे चुकारे शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 5:00 AM
धानोरा येथील आदिवासी सोसायटीमार्फत धान खरेदी केली जाते. शासकीय गोदाम भरल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या मैदानात धानाची खरेदी करण्यात आली. या केंद्रावर धानोरा, सालेभट्टी, चव्हेला, पवनी, माळंदा, खरकाडी, कांदाडी, तुकूम, तोडे, हेटी या १० गावांतील शेतकऱ्यांनी धान विक्रीस आणला होता. यावर्षी धानाचे भरघोस उत्पादन झाले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाची आवक सुद्धा वाढली होती.
ठळक मुद्देधानोरा केंद्रावरील स्थिती : कर्ज भरण्याची अडचण वाढली