लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील १७८ कोटी ४ लाख रुपयांच्या बिग बजेटचे सादरीकरण बुधवारी (दि.२७) नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले. यात वर्षभरात १३८ कोटी ७९ लाख रुपयांच्या खर्चातून विविध कामांसाठी तरतूद करण्यात आली, तर ३९ कोटी ४५ लाख रुपये शिल्लक राहणार आहे. या अंदाजपत्रकाला नगर परिषदेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.नगर परिषदेमार्फत शहर विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आकारास येत असल्याने नगर परिषदेमार्फत सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले राहते. २०१७-१८ पर्यंत १०० कोटी रुपयांपेक्षा कमी निधीचा बजेट सादर केला जात होता. मात्र २०१८-१९ पासून त्यात वाढ झाली आहे. २०१८-१९ मध्ये १२७ कोटी, २०१९-२० मध्ये १८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मधील अर्थसंकल्प जवळपास पाच कोटी रुपयांनी कमी आहे. मात्र मागील दोन वर्षांच्या तुलनेत निधीत वाढ झाली असल्याने याला बिगबजेट अर्थसंकल्प मानले जात आहे.नगर परिषदेला विविध माध्यमातून असलेले कर वसुलीचे अधिकार व नगर परिषदेची स्वत:ची साधने यांच्यामार्फत २०२०-२१ या वर्षात १९ कोटी ६३ लाख रुपये जमा होतील. ५ कोटी ३९ लाख रुपये जुने शिल्लक असे एकूण २५ कोटी २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. नगर परिषदेला प्राप्त झालेले उत्पन्न विविध घटकांवर खर्च करावे लागते. २०२०-२१ या वर्षात नगर परिषद २५ कोटी १ लाख रुपये खर्च करेल, अशी अपेक्षा आहे. शासनाच्या विविध योजनांमार्फत २०२०-२१ या वर्षात ५६ कोटी २३ लाख रुपये प्राप्त होतील, अशी अपेक्षा आहे. प्रारंभीची शिल्लक ६२ कोअी २३ लाख रुपये आहे. वर्षाखेर नगर परिषदेकडे शासनाच्या योजनांच्या माध्यमातून ११८ कोटी रुपये जमा होतील, अशी अपेक्षा आहे. प्राप्त निधीपैकी ८६ कोटी रुपये खर्चुन ३२ कोटी रुपये शिल्लक राहतील, अशी अपेक्षा आहे.पाणीपट्टीत २०० रुपये वाढपाणीपट्टीत किती टक्के होणार आहे, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. अंदाजपत्रकात २०० रुपये वाढ दर्शविण्यात आली आहे. यापूर्वी प्रती जोडणी/प्रती वर्ष १ हजार ३०० रुपये आकारले जात होते. आता पाणीपट्टी कर १ हजार ५०० रुपये करण्यात आला आहे.गडचिरोली शहराची पाणी पुरवठा योजना २० वर्ष जुनी आहे. नदीवर एकच पंप आहे. त्याचीही क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे नदीवर दोन पंप बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी ४० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच पाईपलाईन जुनी असल्याने वेळोवेळी बिघाड निर्माण होते. सदर पाईपलाईनही दुरूस्ती करावी लागणार आहे. वाढीव वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकली जात आहे. तसेच दोन पाण्याच्या टाक्या बांधल्या जात आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा वाढणे आवश्यक झाले आहे. प्रतीवर्षी २०० रुपये जरी वाढ करण्यात आली असली तरी शुध्द व पुरेसे पाण्याचे महत्त्व लक्षात घेता ही वाढ फार नाही. वाढलेल्या निधीतून पुरेसे व शुध्द पाणी देण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न राहणार आहे. शहरातील सर्वच वर्गाचा विचार करून अर्थसंकल्प सादर केला आहे.- योगीता पिपरे, नगराध्यक्ष, नगर परिषद गडचिरोलीमुलांसाठी २० लाखांची खेळणीयावर्षीच्या अंदाजपत्रकात अंगणवाड्यांमधील मुलांसाठी २० लाख रुपयांची खेळणी खरेदी केली जाणार आहेत. तसेच ७ लाख रुपयांच्या गार्डन चेअर घेतल्या जाणार आहेत. मोकाट जनावरे पकडण्यावरील खर्च दुप्पट करण्यात आला असून त्यावर २० हजार रुपयांची तरतूद केली आहे.शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाईपलाईन लिकेज असल्यामुळे अशुध्द पाण्याचा पुरवठा होतो. तरीही नगर परिषदेने २०० रुपये वाढ केली आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. नगर परिषदेचे स्वत:चे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न दिसून येत नाही. आर्थिक व दुर्बल घटकांसाठी ५ टक्के तरतूद अर्थसंकल्पात करायची असताना सुध्दा अर्थसंकल्पात या घटकासाठी निधी राखून ठेवण्यात आला नाही. गटार लाईनसाठी प्राप्त झालेले पाच कोटी रुपये अजुनही अॅक्सिस बँकेतच आहेत. सदर पैसे फिक्स केले असते तर अधिक व्याजदर मिळाला असता.-सतीश विधाते, नगरसेवकमागील वर्षाचे अर्थसंकल्पीय टाळेबंद पत्रक दिले नाही. २०२०-२१ या वर्षाचे अंदाजपत्रक १७८ कोटी रुपयांचे दाखविले आहे. मात्र शासनाकडून निधी प्राप्त होणार नाही. त्यामुळे केवळ फुगवटा असलेला अर्थसंकल्प आहे.-रमेश चौधरी, नगरसेवक
३९.४५ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:00 AM
नगर परिषदेमार्फत शहर विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आकारास येत असल्याने नगर परिषदेमार्फत सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले राहते. २०१७-१८ पर्यंत १०० कोटी रुपयांपेक्षा कमी निधीचा बजेट सादर केला जात होता. मात्र २०१८-१९ पासून त्यात वाढ झाली आहे.
ठळक मुद्देगडचिरोली नगर परिषद : १३८ कोटी ७९ लाखांच्या खर्चाचे नियोजन सादर