कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चामोर्शी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बिपीन शेवाळे, तर प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकुमार शिंदे, क्षेत्र सहायक एस.एम. मडावी, विवेकानंद चांदेकर, सुरेश गव्हारे, एस. पी. करोडकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य पुंडलिक भांडेकर, माजी ग्रा.पं. सदस्य दामोदर गेडाम, पीतांबर टिकले, नवरगावच्या उपसरपंच करिश्मा वणीकर, नवरगावचे माजी सरपंच अनिल कुकडे, अकिल शेख, मयूर गड्डमवार, जिब्राइल शेख, विक्की कोठारे आदी उपस्थित होते.
मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक डॉ. शि. र. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे वनवृत्त समन्वयक नितीन काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी महेशकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक एस.एम. मडावी यांच्या संकल्पनेतील 'बांबूसेटम' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
(बॉक्स)
रोजगाराच्या संधी वाढणार
तहसीलदार शिकतोडे म्हणाले, कागद उद्योगात बांबूचा सर्वांत जास्त वापर होतो. बांबूपासून संगीत वाद्य, कृषी अवजारे, घरगुती भांडी, फर्निचर, चटया, घर बांधणी, सौंदर्य साधने, कुंपण, हस्तकलेच्या वस्तू आदींसाठी वापर होत असतो. कुनघाडा रै. येथील या उपक्रमामुळे भविष्यात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे ते म्हणाले. सदर उपक्रमात १८ प्रजातींच्या बांबूची लागवड करण्यात आली असून, वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकुमार शिंदे व क्षेत्र सहायक एस. एम. मडावी यांनी त्याचे फायदे सांगितले.
===Photopath===
180621\img-20210618-wa0037.jpg
===Caption===
कुनघाडा रे येथे बांबू रोपाची लागवड करताना अधिकारीवर्ग फोटो