शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

बांबूची वाहतूक करणारे वाहने नक्षलवाद्यांनी जाळले

By admin | Published: April 12, 2017 10:58 PM

घोट वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील कोठरी परिसरात कक्ष क्र. ३८३ मध्ये जंगलामधून घोटकडे बांबूची वाहतूक करीत असताना बुधवारी दुपारी १.३० वाजता नक्षलवाद्यांनी वन विभागाचे

घोट (गडचिरोली) : घोट वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील कोठरी परिसरात कक्ष क्र. ३८३ मध्ये जंगलामधून घोटकडे बांबूची वाहतूक करीत असताना बुधवारी दुपारी १.३० वाजता नक्षलवाद्यांनी वन विभागाचे दोन ट्रक व खासगी ट्रॅक्टर जाळल्याची घटना घडली. बल्लारशाह वन विभागाचे ट्रक क्र. एमएच-३४-एबी-५८६४ व ट्रक क्र. एमएच-३४-एबी-६००३ व दोन खासगी ट्रॅक्टर शासकीय कामावर बांबू वाहतुकीसाठी लावण्यात आले होते. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या विठ्ठलवाडा येथील जीवन अवतारे यांचा एमएच-३४-एल-८१७१ व मारडा जिल्हा चंद्रपूर येथील मधु लखमापुरे यांचा एमएच-३३-एफ-१७२९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. हे चारही वाहने बांबू भरून घोटकडे येत असताना कोठरी गावापासून ५ किमी अंतरावर २५ ते ३० नक्षलवाद्यांनी वाहने थांबविले व या वाहनांच्या डिझल टाक्या फोडून वाहनांना आग लावली. घटनास्थळाजवळ एक ट्रॅक्टर नादुरूस्त स्थितीत होता. त्याला सुद्धा आग लावल्याची चर्चा परिसरात आहे. काही दिवसांपासून जंगलांना आगी लागत असल्याने जंगलातील बांबू व इतर लाकूड वाहतुकीसाठी वन विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले होते. दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे वन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे