लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेविडकाळात अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. पैसे येण्याचा मार्ग खडतर झाला तरी खर्चाची गाडी सुसाट वेगाने धावत आहे. कुटुंबावर येणाऱ्या संकटांना सामाेरे जाण्यासाठी काही नागरिकांनी खासगी बॅंकांमधून कर्ज काढले. काही व्यावसायिकांनी शासकीय बॅंकेतून कर्ज काढले. मात्र काेविड महामारीमुळे व्यवसायात मंदी आल्याने या कर्जदार व्यावसायिक व नागरिकांना बॅंक कर्जाचे हप्ते नियमित भरता आले नाही. गेल्या एक वर्षापासून कर्जाचे हप्ते थकीत असून, सर्वच बॅंकांची कर्ज वुसली माघारली आहे.
काेट....
थकीत कर्जाबाबत अधिकारी म्हणतात...
काेविडकाळात अनेक कर्जदार व्यावसायिकांच्या धंद्यांवर फरक पडला आहे. परिणामी कर्जाचे हप्ते थकीत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्जाचे हप्ते नियमित येत आहेत. मात्र व्यावसायिकांच्या उत्पन्नावर परिणाम पडल्यामुळे त्यांच्याकडून विनंतीपत्र घेऊन त्यांना कर्जफेड करण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे. काही व्यावसायिकांनी बॅंक प्रशासनाला सहकार्य केले आहे.
- अनुपम रवी, व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया, शाखा गडचिराेली
बाॅक्स....
काेराेनाने सगळ्यांनाच आर्थिक अडचणीत आणले आहे. परिणामी कर्ज हप्ते थकीत राहण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्जदारांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यापाेटी त्यांनी पैसे भरणे अपेक्षित आहे. काही कर्जदारांकडून अडचणी सांगितल्या जात आहेत. शक्य आहे तेवढी रक्कम कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी भरावी, यासाठी आम्ही कर्जदार खातेदारांना मार्गदर्शन करीत आहाेत.
- व्यवस्थापक, खासगी बॅंक, गडचिराेली
बाॅक्स....
५० जणांना पाठविल्या नाेटीस
विहित मुदतीत कर्जाचे हप्ते भरल्या जात नसल्याने बॅंक प्रशासनाच्या वतीने संबंधित कर्जदारांशी संपर्क साधला. जमेल तेवढी रक्कम भरण्यासाठी प्राेत्साहित केले. काही कर्जदारांनी शक्य तेवढी रक्कम भरली. मात्र काहींनी कर्जाचे हप्ते भरले नाही. गेल्या एक ते दीड वर्षापासून कर्ज हप्ते प्रलंबित राहिल्याने संबंधित कर्जदारांना नाेटीस बजाविण्यात आली आहे. आमच्या बॅंक शाखेतर्फे जवळपास ५० कर्जदारांना नाेटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती बॅंक ऑफ इंडिया शाखा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बाॅक्स....
व्यावसायिक व गृह कर्जाचे प्रमाण अधिक
शासकीय व खासगी बॅंकेतर्फे मालमत्तेचे आवश्यक दस्तावेज अर्थात मॉर्गेज घेऊन नागरिकांना विविध प्रकारचे कर्ज वितरित केले जाते. यामध्ये व्यावसायिक, वैयक्तिक, गृहकर्ज, वाहन कर्ज व तत्सम कर्जांचा समावेश आहे. काेविड महामारीच्या संकटामुळे अनेकांचे कर्ज हप्ते थकीत झाले आहे. यामध्ये व्यावसायिक व गृहकर्जाचे प्रमाण अधिक आहे.
काेट....
व्यवसाय घसरला, कर्ज कसे भरणार
सरकारी बॅंकेतील कर्ज देण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे आपण खासगी बॅंकेतून कर्ज घेतला आहे. माझा हाॅटेलचा व्यवसाय असून यासाठी कर्ज घेतले आहे. दरम्यान, काेराेना संकटामुळे सात ते आठ महिने व्यवसाय बंद हाेता. त्यामुळे कर्जाचे हप्ते थकीत राहिले आहे. बॅंकेकडून अनेकदा विचारणा हाेत आहे. व्यवसाय घसरल्यामुळे कर्जाचे हप्ते थकीत राहिले आहे.
- व्यावसायिक
............................
आठवडी बाजारात आपण रेडिमेट व तत्सम कपड्याचा व्यवसाय लावत असताे. व्यवसायासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले. काेविडपूर्वी सुरुवातीला सहा ते सात महिने कर्जाचा निमित्त भरणा केला. मात्र त्यानंतर काेविड संकटामुळे आठवडी बाजार बंद झाले. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला. उत्पन्नाचा स्त्राेत बंद झाल्याने आता कर्जाचे हप्ते प्रलंबित राहिले आहेत.
- व्यावसायिक
काेट...
गृहकर्ज थकले
काेराेनामुळे खासगी नाेकरीवर परिणाम झाला. आता छाेटा-माेठा काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. बॅंकेकडून घर बांधकामासाठी कर्ज घेतले. वर्षभर कर्जाच्या हप्त्याची नियमित परतफेड केली. मात्र काेराेनामुळे खासगी नाेकरीवरून घरी बसावे लागले. उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने गृहकर्ज थकीत झाले आहे.
- कर्जदार
............
घर बांधकामासाठी खासगी बॅंकेकडून आपण दीड लाख रुपयांचे कर्ज दाेन वर्षांपूर्वी घेतले. मात्र काेविडकाळात राेजगार हिरावल्याने कर्ज थकितचे प्रमाण वाढले आहे. बॅंक प्रशासनाशी बाेलून आपण कर्ज परतफेडीसाठी आपण मुदत वाढवून घेतली आहे. काेराेनामुळे यंदा संकट काेसळले आहे.
- कर्जदार