लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ग्रामीण पाणी पुवरठा विभागामार्फत वैरागड भागासह गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांमध्ये ट्रिपल फिल्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या माध्यमातून अनेक गावांमध्ये शुध्द पाण्याची बँक सुरू केल्याने गावातील नागरिकांना आता मोफत शुध्द पाण्याची सोय होणार आहे. पाटणवाड्यातही अशा प्रकारची सुविधा झाली आहे.वैरागड ग्रामपंचायती अंतर्गत पाटणवाडा येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने ट्रिपल फिल्टरची व्यवस्था करून देण्यात आली. गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रती दिवस २० लिटर शुध्द पाणी मिळणार आहे. यासाठी एक वॉटर कार्ड देण्यात आला. ज्या प्रमाणे एटीएममध्ये आपण कार्डचा वापर करून अपेक्षित कार्यवाही पूर्ण करतो. अपेक्षित रक्कम मिळविता येते. त्याच प्रमाणे वॉटर कार्डचा वापर केल्यानंतर एका दिवशी एका कुटुंबाला २० लिटर शुध्द पाणी मिळविता येणार आहे. या सुविधेपोटी नागरिकांना कोणताही आर्थिक मोबदला द्यावा लागणार नसल्याची माहिती आहे. ही वॉटर बँक चालविण्यासाठी रोजंदारीवर एका व्यक्तीची निवड करण्यात आली असून या वॉटर बँकेचे संचालन संबंधित व्यक्तीकडून केले जात आहे.सदर उपक्रमाचा शुभारंभ पेसा कायद्यांतर्गत झालेल्या ग्रामसभेच्या दिवशी सरपंच गौरी सोमनानी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पोलीस पाटील परसराम कुमरे, ग्राम विकास अधिकारी जे. एन. घुटके, ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.पिण्यायोग्य पाणी नसल्याने उपाययोजनायापूर्वी पाटणवाडा गावात आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य पाणी स्त्रोत नसल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या तपासणीत सिध्द झाल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने या गावात शुध्द पाण्याची व्यवस्था फिल्टरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आता गावातील नागरिक व महिलांना प्रती दिवस २० लिटर पाणी एका कुटुंबासाठी उपलब्ध होणार आहे.
पाटणवाडात शुद्ध पाण्याची बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:02 AM
ग्रामीण पाणी पुवरठा विभागामार्फत वैरागड भागासह गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांमध्ये ट्रिपल फिल्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या माध्यमातून अनेक गावांमध्ये शुध्द पाण्याची बँक सुरू केल्याने गावातील नागरिकांना आता मोफत शुध्द पाण्याची सोय होणार आहे. पाटणवाड्यातही अशा प्रकारची सुविधा झाली आहे.
ठळक मुद्देमोफत सेवा । ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा पुढाकार