लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नात वाढ करावी, तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांतील शासकीय खाती बंद करण्यात येऊ नये, इतर बँकांत वर्ग करण्यात येतील. त्यामुळे बँकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.केंद्र शासनाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत कृषी कल्याण अभियानाची मोहीम १ जून ते ३१ जुलै या कालावधीत सुरू आहे. साखरा येथे प्रशिक्षण वर्गास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जि. प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, साखराचे सरपंच तुकाराम अंबादे, ग्रा. पं. सदस्य सीता गेडाम, दर्शना खंडारे, प्रभा गेडाम, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कऱ्हाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी डोंगरवार, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. तारू, डॉ. कदम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंत उंदीरवाडे, हेमके उपस्थित होते.बळीराजा सेंद्रीय गटाचे प्रवर्तक नामदेव उंदीरवाडे यांनी गोप्स ब्राँडच्या तांदळाचे पॅकिंग देऊन जिल्हाधिकाऱ्यांची स्वागत केले. डॉ. प्रकाश पवार यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी असलेल्या कृषी पूरक योजनांची माहिती दिली. मधुमक्षिका पालन, अळींबी उत्पादन यासह विविध माहिती असलेल्या घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच भाजीपाला बियाणे तूर मिनीकीट, जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप जिल्हाधिकाºयांच्या हस्ते करण्यात आले.
बँकांनी नियमांचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:52 PM
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नात वाढ करावी, तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : साखरा येथे कृषी कल्याण अभियान