लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पोलिसांच्या आवाहनानंतर धुळेपल्ली गावातील नागरिकांनी तीन भरमार बंदुका पोलीस मदत केंद्र ताडगाव येथे जमा करण्यात आल्या आहेत.ज्या नागरिकांकडे भरमार बंदुका व इतर शस्त्र आहेत. ही शस्त्र पोलिसांकडे जमा करावी, असे आवाहन पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी समीर दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल नामदे, महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम गोरे यांच्यासह ताडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावकºयांना केले होते. भरमार बंदुक बाळगणे कायद्यान्वये गुन्हा आहे. शस्त्रांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याजवळ असलेल्या भरमार बंदुका जमा करण्यात याव्या, असे आवाहन पोलीस विभागाने केले होते.पोलीस विभागाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवित गावकºयांनी प्रभारी अधिकारी समीर दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल नामदे, सीआरपीएफ ९ बटालियनचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांच्या समक्ष बंदुका जमा करण्यात आल्या. यावेळी पोलीस दलातर्फे गावकºयांचा सत्कार करण्यात आला. बंदुकीची साथ सोडून शिक्षणाची कास धरावी, आपल्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना चांगले नागरिक घडवावे, आपला मुलगा मोठ्या पदाची नोकरी प्राप्त करेल, यासाठी प्रयत्न करावा किंवा एखादा रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले.
भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 10:31 PM
पोलिसांच्या आवाहनानंतर धुळेपल्ली गावातील नागरिकांनी तीन भरमार बंदुका पोलीस मदत केंद्र ताडगाव येथे जमा करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देताडगाव मदत केंद्र : धुळेपल्लीतील नागरिकांचा सत्कार