लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा लाभ सुशिक्षित बेरोजगारांनी घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.पोलीस मुुख्यालयातील एकलव्य धाम सभागृहात गुरूवारी १८ ते ३५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार मुली व महिलांसाठी पोलीस दल व पार्र्किंसन्स इन्स्टिट्युट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.पार्र्किंसन्स इन्स्टिट्युटचे नितीन ठाकरे यांनी नर्सिंग असिस्टंट या कोर्सबद्दल माहिती सांगून सदर निवासी प्रशिक्षण जिल्ह्यातील तरूणींसाठी पूर्णपणे मोफत असल्याचे सांगून अधिकाधिक तरूणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. मेळाव्यात ६६२ मुली व महिलांनी नर्सिंग प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली. नोंदणी झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी २५ ते ३० जून दरम्यान होणार असून पात्र महिलांची निवड नागपूर येथे होणाऱ्या नर्सिंग प्रशिक्षणासाठी होईल. सदर प्रशिक्षण पूर्ण करणाºया तरूणी व महिलांना पार्र्किंसन्स इन्स्टिट्युटतर्फे नोकरीची शाश्वती देण्यात आली आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे निश्चितय फायदा होईल व स्वयंपूर्ण होण्यास मदत मिळेल, अशी भावना उपस्थित तरूणी व महिलांनी व्यक्त केली.या मेळाव्याला अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच पार्र्किंसन्स इन्स्टिट्युटचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी उप अधीक्षक (गृह) प्रदीप चौगावकर, राखीव पोलीस निरीक्षक ठाकूर, कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सम्राट वाघ, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पवार, जनसंपर्क अधिकारी प्रशांत दिवटे व पोलीस कर्मचाºयांनी सहकार्य केले. या मेळाव्याला शेकडो तरूणी व महिला उपस्थित होत्या.
कौशल्य प्राप्त करून सक्षम व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:27 AM
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा लाभ सुशिक्षित बेरोजगारांनी घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे आवाहन : पोलीस दलातर्फे बेरोजगार मुली व महिलांसाठी मेळावा