कन्ना मडावी यांचे आवाहन : अहेरी नगर पंचायतीत मार्गदर्शनअहेरी : आधुनिक युगात महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करून महिलांनी सक्षम व्हावे व आजच्या स्पर्धेत टिकून प्रगती साधावी, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी शुक्रवारी केले. अहेरी नगर पंचायतीच्या सभागृहात महिलांना मार्गदर्शन व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. प्रीती डंबोळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रा. मीनाक्षी वेरूळकर, नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, सहकारी बँकेचे व्यवस्थापक चंद्रशेखर मुक्कावार उपस्थित होते. महिलांवरील अन्याय, अत्याचाराविरोधात विविध कायदे करण्यात आले आहेत. या कायद्यांचा आधार घ्यावा, असे आवाहन डंबोळे यांनी केले. आरोग्य शिबिरात तज्ज्ञांमार्फत ५० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरात प्रयोगशाळा तंत्रज्ञ सरिता वाघ, व्यंकटेश दिकोंड, सिरीन कुरेशी, समुपदेशक मनीषा कांचनवार, अधिपरिचारिका प्रीती आत्राम, शरद बांबोळे, मेहराज शेख यांनी आरोग्य चिकित्सा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता पटवर्धन, संचालन हर्षा ठाकरे तर आभार रेखा सडमेक यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
आव्हानांचा सामना करून सक्षम व्हा
By admin | Published: March 13, 2016 1:28 AM