गडचिराेली : जिल्ह्यात चिकुनगुनिया व काविळचे रुग्ण आढळून आले नसून त्याची साथही नाही; मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ३६ रुग्ण आढळून आले. यापैकी दाेन रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. ते रुग्ण तपासणी व औषधाेपचारासाठी गडचिराेली जिल्ह्यात आल्याने त्यांची नाेंद करण्यात आली.
डेंग्यू व चिकुनगुनिया हे कीटकजन्य आजार आहे. तर कावीळ हा पाण्यापासून हाेणारा जलजन्य आजार आहे. हे तीनही आजार गंभीर आहेत. वेळीच याेग्य औषधाेपचार न मिळाल्यास प्रसंगी रुग्णांचा जीवही जाताे. आराेग्य विभागाच्या वतीने यासंदर्भात जनजागृती करून औषधाेपचार मिळाल्याने आढळून आलेल्या सर्वच रुग्णांची प्रकृती धाेक्याबाहेर आहे. काही रुग्ण अजूनही घरी राहून गाेळ्या खात आहेत. अशाप्रकारचे आजार हाेऊ नयेत, यासाठी लहान मुला-मुलींसह सर्वांनीच स्वच्छतेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
बाॅक्स....
चिकुन गुनिया व काविळचा रुग्ण नाही
गडचिराेली जिल्ह्यात गेल्या एक ते दाेन महिन्यात चिकुनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नाही. तसेच काविळ रुग्णाच्या बाबतीतही जिल्हा निरंक आहे. या दाेन्ही रुग्णांची जिल्ह्यात कुठेही साथही नाही, अशी माहिती आराेग्य विभागाकडून मिळाली आहे.
...........
लहान मुलांनाही झाली हाेती डेंग्यूची बाधा
- एक ते दीड महिन्यापासून गडचिराेली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात व्हायरल तापाची साथ आहे. सर्दी, खाेकला, तापाने अनेक बालक ग्रस्त हाेते.
- १५ ते २० दिवसांपूर्वी काही लहान बालकही डेंग्यूग्रस्त आढळून आले हाेते. त्यांच्यावर उपचार झाले.
.............
काय आहेत लक्षणे ?
डेंग्यू : एडीस डासाच्या मादीने दंश केल्यावर ३ ते १४ दिवसांच्या आत डेंग्यूची लक्षणे दिसून येतात. यामध्ये ताप, तीव्र डाेकेदुखी, डाेळ्यांचे मागे वेदना, मळमट, उलटी.
चिकुनगुनिया : ताप येणे, पाय, गुडघा, मनगट व हाताला तीव्र वेदना हाेतात. तीव्र पाठदुखी, डाेळ्यांना वेदना हाेतात. याशिवाय स्नायू व सांध्यावर सूज येते.
कावीळ : डाेळे, त्वचा, नखे पिवळ्या रंगाची हाेणे, भूक मंदावणे, मळमळ वाटणे, उलट्या हाेणे, त्वचेला खाज सुटणे, ताप येणे, अंग माेडून जाणे, पाेटामध्ये वेदना हाेणे व लघवी पिवळी जर्द आणि गडद हाेणे आदी लक्षणे आहेत.
काेट...
गडचिराेली जिल्ह्यातील सहा तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण यापूर्वी आढळून आले. सर्व रुग्णांवर औषधाेपचार सुरू असून दवाखान्यातून ते घरी गेले आहेत. ते पूर्णत: बरे झाले नसले तरी त्यांची प्रकृती आता धाेक्याबाहेर आहे. आमच्या विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले.
- डाॅ.कुणाल माेडक, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिराेली