गडचिरोली : काेराेना महामारीच्या संकटकाळात आबालवृद्धापासून सर्वचजण घरी हाेते. मुला-मुलींना मनाेरंजनाचे सहज उपलब्ध लोणारे साधन म्हणजे स्मार्टफाेन आणि टीव्ही हाेय. त्यातच टीव्हीसमाेर बसून मुले जेवण करीत असल्याचे प्रकार वाढले. मात्र या सवयीमुळे मुलांमध्ये पाेटाचे विकार वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
काेराेनाकाळात बऱ्याच सवयींमध्ये बदल दिसून आला आहे. यात बच्चेकंपनीही मागे राहिली नाही. अशा परिस्थितीत मुलांना करमणूक किंवा मनाेरंजनाचे साधन म्हणून पालकांनी माेबाइल, लॅपटाॅपवर खेळण्याची मुभा दिली. तसेच टीव्ही पाहण्याचा कालावधीही आपसुकच वाढला. टीव्हीसमाेर बसूनच जेवणाची सवयसुद्धा बऱ्याच मुलांना लागली आहे. घरच्या घरीच राहत असल्याने आई किंवा बाबांकडे फास्ट फूड घेऊन मागायचा हट्टही मुलांकडून केला जात आहे. ताे पदार्थही टीव्हीसमाेर बसूनच मुले, मुली खात असतात. या सवयीमुळे त्यांना विकार जडण्याची परिस्थिती निर्माण हाेऊ शकते. तिखट, मसालेदार किंवा तेलकट पदार्थांनी मुलांचे आराेग्य धाेक्यात येऊ शकते. याकडे पालक व पाल्यांनी जागरूक राहून लक्ष देणे गरजेचे आहे.
बाॅक्स...
पाेटविकाराची प्रमुख कारणे
लहानसहान कारणावरून पाेटविकार हाेत असतात; परंतु गेल्या १२ ते १५ महिन्यांपासून घरच्या घरी राहून बच्चे कंपनीच्या अनेक सवयी बदलल्या आहेत. टीव्हीसमाेर बसून जेवण किंवा अन्य पदार्थ खात असतील तर पाेटविकार वाढण्याची शक्यता असते. मानसिकरीत्या चिंता किंवा तिखट, मसाले पदार्थाचे सेवन ही पाेटविकाराची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय जेवताना घाई करणे, चावून-चावून न खाणे, मैदानी खेळांचा अभाव या बाबी पाेटविकाराला कारणीभूत ठरू शकतात.
बाॅक्स...
पाेटविकार टाळायचे असतील तर...
- लहान मुलांची सवय आपल्याला बदलता येते; परंतु पाेटविकाराच्या बाबतीत उशीर करता कामा नये; कारण पाेटाचे दुखणे मुलांसाठी कधी-कधी गंभीर बनू शकते.
- पाेटविकार टाळायचे असल्यास मुलांना सात्त्विक आहार देणे याेग्य आहे. घरीच केलेला स्वयंपाक व त्यात अतितिखट व जास्त तेलकट पदार्थ नसावेत.
- आहारात सलादचा वापर करावा. जेणेकरून मुलांची पचनक्रिया सहज हाेईल. याशिवाय फळेही खायला द्यावेत. मुला, मुलींना पचण्यास हलके असणारे पदार्थ खाण्यास द्यावेत. जेवणात वरण, भाजी, पाेळी, आदींचा समावेश असावा.
काेट...
अनेकदा माझा मुलगा व मुलगी टीव्ही बघण्यासाठी हट्ट करीत असतात. कधीकधी चार ते पाच तासांपर्यंत टीव्ही पाहत असतात. टीव्हीसमाेर बसूनच ते जेवण करीत असल्याने चिंता वाढली आहे.
- संगीता कुनघाडकर
..............
मुलांनी एकदा हट्ट केला तर ती सहसा मागे जात नाहीत. आपल्यालाच त्यांच्या हाैशी पूर्ण कराव्या लागतात. माझी मुलेही टीव्हीसमाेर बसून जेवतात. ही बाब याेग्य नाही. याची मला जाणीव आहे.
- मीना तांगडे
................
काेराेना संकटामुळे मुलांच्या अनेक सवयी बदलल्या, यात शंका नाही. परंतु बालकांमध्ये पाेटविकार ही बाब चांगली नाही. खाण्यापिण्याबाबत मुलांना शिस्त लावणे गरजेचे आहे. मुला, मुलींचे मन परावृत्त करून त्यांना जेवणात सात्त्विक आहाराचा समावेश केला पाहिजे. तिखट, मसाल्यांचा वापर तसेच चिंता व जेवणात घाई करणे, आदींमुळे पाेटाचे विकार हाेतात.
- डाॅ. प्रशांत कारेकर, जनरल फिजिशियन
..................
बालकांना एखादी गाेष्ट हवीहवीसी वाटते. तसेच टीव्हीबाबतही आहे. माेबाइल, टीव्ही हे बालकांचे नवीन व्यसनच बनले आहे. मात्र पालकांनी आपल्या मुला, मुलींना अधिक वेळ टीव्ही व माेबाइलमध्ये व्यस्त ठेवू नये. तीन वर्षांच्या आतील बालकाला तर माेबाइल देऊच नये. माेबाइलच्या अती वापराने मुलांमध्ये चिडचिडपणा वाढताे. त्यामुळे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
- डाॅ. प्रशांत चलाख,
बालराेगतज्ज्ञ