शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

सावधान..! कोरचीत बिबट्या पोलिस ठाण्यापर्यंत पोहाेचला

By गेापाल लाजुरकर | Published: December 06, 2023 8:55 PM

नागरिकांमध्ये दहशत : बंदाेबस्त करण्याची मागणी

गडचिराेली : कोरची शहरातील पोलिस स्टेशन जंगलालगत आहे. या परिसरात रात्रीच्या सुमारास अन्य वन्यप्राणी दिसून येतात. परंतु बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास कर्तव्यावरील पाेलिस कर्मचाऱ्यांना बिबट मुक्तपणे संचार करताना आढळून आला. त्यामुळे या परिसरातील पाेलिस कर्मचारी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पाेलिस स्टेशनच्या बाहेरील आवारात बिबट दिसून आल्याने त्याचा लवकर बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोरची शहराच्या चारही दिशेने जंगल असल्याने जंगलातील प्राण्यांचा मुक्त संचार असताे. या परिसरात रानटी प्राणी अधूनमधून दृष्टीस पडतात. परंतु मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे. विशेष म्हणजे, पोलिस स्टेशन परिसरात तहसील कार्यालय, वनश्री महाविद्यालय, शासकीय आश्रम शाळा, पंचायत समिती कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गट साधन केंद्र आदी शासकीय तसेच निम शासकीय कार्यालये आहेत. याशिवाय परिसरात अनेक लाेकांची घरे आहेत. रात्री उशिरापर्यंत कोरची-भीमपूर मार्गाने नागरिकांची ये-जा सुरू असते, तसेच पहाटे थंडीच्या दिवसात फिरायला व व्यायाम करण्यासाठी नागरिक जात असतात. सकाळी काॅलेजमध्ये विद्यार्थी जातात. याशिवाय जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गरीब व गरजू नागरिक जातात. बिबट्यापासून त्यांना धोका हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेडगाव वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

तीन बिबट्यांचा वावरकाेरची तालुक्याच्या जंगल परिसरात जवळपास तीन बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता बेडगाव वनपरिक्षेत्राचे एल. एम. ठाकरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यापूर्वी टेमली व सोनपूर येथील दोन गायींना बिबट्यांनी ठार केले. त्यामुळे या बिबट्यांचा बंदोबस्त होईपर्यंत नागरिकांनी समूहाने फिरावे, एकटे फिरू नये, सरपण गोळा करायला जायचे असेल तर समूहाने जावे. एकटे जाऊ नये,असे आवाहन वन विभागाने केले.

टॅग्स :leopardबिबट्याGadchiroliगडचिरोली