श्री गोंविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा येथे आयोजित पदवी वितरण कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ते मार्गदर्शन करीत हाेते. अध्यक्षस्थानी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक संशोधन संस्था गडचिरोली अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. किशोर खोपे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ अभय साळुंखे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य मुनघाटे यांनी महाविद्यालयाचा वाटचालीचा आढावा सादर केला. येथील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत विद्यापीठ तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख करीत विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घेत वाटचाल करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमात विद्यान,कला, पदवीधारक तसेच समाजशास्त्र व मराठी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रतीकात्मक स्वरूपात ३० विद्यार्थांना मान्यवरांचा हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. संचालन प्रा. डॉ. अमित रामटेके व आभार प्रदर्शन प्रा. हेमलता उराडे यांनी केले.
गर्दीचा एक भाग बनण्यापेक्षा दिशा देणारे व्यक्तिमत्व बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:36 AM