लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रगतीचे पहिले पाऊल हे शिक्षण असून देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगले उच्च शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. या शिक्षणाद्वारे तुम्ही जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक अशा मोठ्या पदावर जाऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी केले.शासनामार्फत आपला महाराष्ट्र सुवर्ण जंयती सहल योजनेंतर्गत आयोजित केलेल्या गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहल नागपूरात आली असता नक्षल विरोधी अभियान, नागपूर, मैत्री परिवार व साई भक्त साई सेवक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती मार्गावरील साई श्रध्दा लॉन येथे आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते. मंचावर सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, मैत्री परिवाराचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, प्रसिध्द शेफ विष्णु मनोहर, राजीव जैस्वाल, पोलीस उपअधिक्षक संजीव म्हैसेकर, निरंजन वासेकर उपस्थित होते. यावेळी इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.संचालन व आभार प्रदर्शन प्रा. माधुरी यावलकर यांनी केले. कार्यक्रमात पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व सहलीतील विद्यार्थी उपस्थित होते.
विकासासाठी मोठे अधिकारी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:22 AM
प्रगतीचे पहिले पाऊल हे शिक्षण असून देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगले उच्च शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. या शिक्षणाद्वारे तुम्ही जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक अशा मोठ्या पदावर जाऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावा, .....
ठळक मुद्देपोलीस महानिरीक्षकांचे आवाहन : महाराष्ट्र दर्शन सहलीतील विद्यार्थ्यांशी संवाद