लाेकमत न्यूज नेटवर्क
धानाेरा : शेतकरीविराेधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे देशव्यापी आंदाेलन करण्यात आले. मात्र आंदाेलकांवर लाठीचार्च करण्यात आला. सरकारच्या विराेेधात केलेले आंदाेलन दडपण्याचे प्रकार सरकारकडून सध्या सुरू आहेत. या दडपशाहीला अंगणवाडी महिला व कामगारांनी घाबरून जाऊ नये. आपले अधिकार व न्याय हक्क मिळविण्यासाठी महिला व कामगारांनी सज्ज राहावे, असे आवाहन अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केले.
धानाेरा येथे अंगणवाडी महिलांचा मेळावा आशा चंदेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून ते बाेलत हाेते. ललिता केदार म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या आंदाेलनामुळे कष्टकरी जनतेला लढण्याची प्रेरणा मिळाली. लाेकशाहीच्या नावाखाली सरकारचे ठाेकशाही कशी सुरू आहे, अशी माहिती केदार यांनी दिली. आरती मेश्राम यांनी आभार मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी यामिनी झंझाळ, प्रतिभा भाेसले, सुशीला कार, चंद्रकला कुंभारे आदींनी सहकार्य केले.
बाॅक्स....
गडचिराेलीत आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा मेळावा
संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा मेळावा गडचिराेली येथे के.पी. काेवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संताेष धाेटे, प्रमाेद गाेडघाटे, प्रवीण मडावी, संघटनेचे गडचिराेली प्रकल्पस्तरीय अध्यक्ष चित्रकुट काेवे, उपाध्यक्ष लालाली मडावी, सहसचिव वंदना गेडाम, सचिव लाेमेश लाेंढे, सहसचिव मुकरू वाटला, सहसचिव मनीषा आत्राम, कार्याध्यक्ष विवेक उईके, प्रवीण मडावी, गणेश तुरकीवार, काेषाध्यक्ष एम.के. साखरे, एस.जी. पाेरेड्डीवार आदी उपस्थित हाेते.