लोकमत न्यूज नेटवर्कघोट : वाहनचालक मालकाविरोधात असलेल्या शासनाच्या धोरणाविरूद्ध संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे, याकरिता वाहनचालक मालकांनी एकजूट व्हावे, असे आवाहन चालक-मालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हळनोर यांनी केले.चामोर्शी तालुक्यातील घोट येथे चालक-मालक असोशिएशनतर्फे विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले. या मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक सचिव आलम शेख, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विलास महल्ले, विदर्भ प्रदेश सचिव विनोद चांदेकर, मधुकर सिनारे, बाळू महाराज, दादासाहेब जाधव, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, प्रवीण वाघे, दतात्रय लोंढे, योगेश गाडगे, बालाजी खांडरे उपस्थित होते. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना संजय हळनोर म्हणाले, वाहन चालक-मालक समाजात सर्वात वंचित घटक असून संघटनेच्या माध्यातून विविध प्रलंबित मागण्या शासन दरबारी मांडण्याची गरज आहे. मागण्या मांडल्यानंतर शासन समस्यांकडे दुर्लक्ष करीत असेल तर वेळप्रसंगी शासनाविरोधात संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, यासाठी सर्वांनी तयार असावे, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू महाराज संचालन व आभार रितेश गवई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चामोर्शी तालुका अध्यक्ष अफरोज सय्यद, उपाध्यक्ष मारोती सोनटक्के, सचिव प्रशांत शाहा, अमित शाहा, राकेश भैसारे, अमर शाहा, शेखर मंडल, सुधीर देवतळे, तुषार कुडू, उत्तम शाहा, प्रितम भोवरे, गणेश वडेट्टीवार, लिलिंद्र बुरांडे, सुनिल नेवारे, प्रफुल खंडारे, अस्लम शेख यांनी सहकार्य केले. याप्रसंगी चालक-मालक असोसिएशन तसेच चालक-मालक संघटनेचे परिसरातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शासन धोरणाविरूद्ध एकजूट व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:27 AM
वाहनचालक मालकाविरोधात असलेल्या शासनाच्या धोरणाविरूद्ध संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे, याकरिता वाहनचालक मालकांनी एकजूट व्हावे, असे आवाहन चालक-मालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हळनोर यांनी केले.
ठळक मुद्देघोट येथे विदर्भस्तरीय मेळावा : वाहन चालक-मालक संघटनेच्या अध्यक्षांचे आवाहन