शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

विजेपासून सावधानता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 11:50 PM

पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे आवाहन : पावसाळ्यात विशेष खबरदारी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीज तारा, वीज खांब, रस्त्याच्या बाजुचे फिडर पिल्लर, रोहित्राचे लोखंडी कुंपन, फ्युज बॉक्स तसेच घरात असलेली ओलसरे विद्युत उपकरणे, शेती पंपाचा स्वीच बोर्ड आदीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. मुसळधार पाऊस किंवा वादळी वारा यामुळे झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकला जातो. परिणामी वीज तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे, या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.शहरी व ग्रामीण भागात विजेची कोणतीही दुर्घटना घडल्यास १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५, १९१२०, १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही कंपनीच्या मोबाईलवरून तसेच लॅन्डलाईन क्रमांकावरून वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देता येणार आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र किंवा वीज पुरवठा बंद करण्यात येतो. नागरिकांच्या हितासाठीच वीज पुरवठा खंडीत होतो. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.घरातील उपकरणे ओलाव्यापासून दूर ठेवापावसाळ्यात घरातील स्वीच बोर्ड किंवा विजेच्या उपकरणाचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खबरदारी घ्यावी. घरात शॉर्टसर्कीट झाल्यास मे स्वीचवरून वीज पुरवठा बंद करावा. घरातील दूरचित्रवाहिणीचे डीश किंवा एन्टीना वीज तारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्वीच बोर्डापासून सर्व बंद करावी. विशेषत: टिनपत्राच्या घरात राहणाºया नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. दुचाकी टेकवून ठेवू नये. विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळू घालू नये, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीज