सिडाम यांच्या म्हणण्यानुसार, चामोर्शी तालुक्यातील कढोली येथील प्रफुल ताराचंद्र सिडाम (३३) यांचे त्यांच्या घरालगत दारूचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाशी भांडण झाले. याबाबत २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता प्रफुल सिडाम हे आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. पण, उपनिरीक्षक गणेश जंगले यांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. तसेच रात्री ११ वाजताच्या सुमारास बेदम मारहाण केली. हे सर्व पाहून त्यांची आई बेशुद्ध पडली. मध्यरात्रीनंतर १़ ३० वाजता पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांनी तक्रार नोंद करून घेतली. मारहाणीत प्रफुल सिडाम यांना गुप्त मार लागल्यामुळे गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचार सुरू आहेत. पत्रकार परिषदेला विचारक्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संचालक अनुप मेश्राम उपस्थित होते.
बाॅक्स :
मारहाण केली नाही - जंगले
यासंदर्भात आष्टी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक जंगले यांनी आपण तक्रारदारास कोणत्याही प्रकारची मारहाण केली नसल्याचे सांगितले. आपण केवळ तक्रारदारास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत, असेही उपनिरीक्षक जंगले म्हणाले.