लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीसोबतच मधमाशी पालन जोडव्यवसाय करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषय, विशेषतज्ज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी कल्याण अभियानांतर्गत चामोर्शी तालुक्याच्या नवेगाव रै. येथे शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.याप्रसंगी मंचावर विषय विशेषतज्ज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, तालुका कृषी अधिकारी व्ही. ए. राजपूत, मंडळ कृषी अधिकारी व्ही. एस. वळवी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक उंदीरवाडे, नवेगावच्या सरपंच उषा दुधबळे, उपसरपंच नैैताम, गणपती सातपुते, मोरेश्वर भांडेकर, कवडू दुधबळे, सुरेश मुनगेलवार, तुळशीदास भांडेकर, पी. भांडेकर, नकटू गव्हारे, आबाजी चिचघरे, रामू सातपुते, तुकाराम कोठारे, शंकर गव्हारे, के. मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.गणपती सातपुते यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शन कार्यक्रमाची प्रशंसा केली. तसेच शेतकºयांनी मार्गदर्शनासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहावे, असे आवाहन केले. उंदीरवाडे यांनी सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करून आत्मा अंतर्गत असलेल्या योजनांची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी राजपूत यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शनातून केले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मधमाशी पालन व्यवसाय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:46 AM
शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीसोबतच मधमाशी पालन जोडव्यवसाय करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषय, विशेषतज्ज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर यांनी केले.
ठळक मुद्देपुष्पक बोथीकर यांचे आवाहन : नवेगाव रै. येथे शेतकरी प्रशिक्षण; कृषी निविष्ठांचे वाटप