टाटा ट्रस्टने मृद व जलसंधारण, तसेच जलसंवर्धनाचे काम हाती घेतले आहे. त्याअंतर्गत तलावाचा गाळ उपसा करणे व तलावांचा जलसाठा वाढविणे, त्याचबरोबर गावामध्ये शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची शाश्वती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. भाडभिडी मोकासा गावातील शेतकऱ्यांनी जलसंधारण व जलसंवर्धन करण्यासाठी एक प्रयत्न करून टाटा ट्रस्टच्या पुढाकाराने पाण्याचे योग्य नियमन व्हावे व तलावाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निस्तार हक्कधारक शेतकऱ्यांचा पाणी वापर गट स्थापन केला. पाणी वापर गटाचे अध्यक्ष एकनाथ कुनघाडकर यांच्याहस्ते तलावाचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सचिव धनराज शेट्ये, सदस्य चरणदास कुनघाडकर, नागेश्वर वैरागडे, विश्वनाथ गेडाम, गजानन कोमलवार, माजी सरपंच गणपतराव उरवेते, टाटा ट्रस्टचे महेश आभारे, आशिष हिवंज, पवन राऊत उपस्थित हाेते.
===Photopath===
270521\img-20210527-wa0181.jpg
===Caption===
भाड भिडी मोकासा येथील मालगुजारी तलावाचे भूमिपूजन