लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने दुसºया बाजूच्या कामाला शनिवारपासून सुरूवात झाली आहे.वर्षभरापासून शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. कामामुळे शहरातील वाहतूक एकतर्फी करण्यात आली आहे. याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे कामाची गती वाढवून काम तत्काळ पूर्ण होईल, याचे प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे. गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील लांझेडापासून बांधकामाला सुरूवात झाली होती. नवेगाव कॉम्प्लेक्सपर्यंत एका बाजूचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता लांझेडा येथूनच दुसरीही बाजू खोदली जात आहे. शनिवारी दिवसभर पोकलॅन्डच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले. त्यामुळे बराच भाग खोदून झाला आहे. बºयाच ठिकाणी जागा सोडून बांधकाम करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बांधकाम शिल्लक आहे. त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आला आहे. शहरातून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. या मुरूमावरून मोठे वाहन गेल्यानंतर मोठी धूळ उडते. धुळीमुळे वाहनधारक, दुकानदार त्रस्त झाले आहेत.पावसाळ्यापूर्वी दुसरीही बाजू काम पूर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसºया बाजूची नाली अजूनपर्यंत खोदण्यात आली नाही. तसेच रस्ता दुभाजकाचेही काम करावे लागणार आहे. हे सर्व काम करण्यास पुन्हा वेळ लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम आटोपणार की नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.चामोर्शी मार्गाची दुर्दशा कायमचामोर्शी मार्गाची यावर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली. मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने गिट्टी व मुरूम टाकला आहे. इंदिरा गांधी चौक ते विज्ञान महाविद्यालयापर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमधून वाहन नेताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुरूम व गिट्टीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. या मार्गाच्याही कामाला लवकर सुरूवात करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या बाजूच्या कामाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 6:00 AM
पावसाळ्यापूर्वी दुसरीही बाजू काम पूर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसºया बाजूची नाली अजूनपर्यंत खोदण्यात आली नाही. तसेच रस्ता दुभाजकाचेही काम करावे लागणार आहे. हे सर्व काम करण्यास पुन्हा वेळ लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम आटोपणार की नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देखोदकामास प्रारंभ । रस्त्यावरील मुरूमाच्या धुळीमुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त