लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन बुधवारी थाटात पार पडले. उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्ज्वलीत करून क्रीडा संमेलनाचे उद्घाटन झाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. विपीन इटनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून कुरखेडाचे तहसीलदार अजय चरडे, जि. प. सदस्य भाग्यवान टेकाम, पं. स. सदस्य माधुरी मडावी, सोनसरीचे सरपंच दादाजी प्रधान, पोलीस पाटील सुमित्रा वालदे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, नोडल अधिकारी तथा माध्यमिक शिक्षक अनिल सोमनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नेताजी बन्सोड, योगराज जनबंधू आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विपीन इटनकर म्हणाले, सर्व खेळाडू विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करावे, चिकाटीने खेळून गडचिरोली प्रकल्पाचा नावलौकिक खेळाडूंनी करावा, या संमेलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी खेळाचा उद्देश केवळ मनोरंजन नसून शैक्षणिक, सांस्कृतिक व मानसिक विकासासाठी खेळ खेळणे अत्यावश्यक आहे व सर्व खेळ सद्भावनेने खेळले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.सर्वप्रथम लेझीमच्या तालावर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान रेगडी व येंगलखेडा आश्रमशाळेच्या मुला, मुलींनी पारंपरिक गोंडी नृत्य सादर करून उपस्थित मान्यवर व नागरिकांची मने जिंकली. प्रकल्पातील अंगारा व कोरची आश्रमशाळेच्या संघात १९ वर्ष वयोगटातील मुलांचा कबड्डीचा उद्घाटनीय सामना पार पडला. या सामन्यामध्ये कोरची आश्रमशाळेच्या संघाने विजय मिळविला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ए.के. इरकापे, संचालन एम.एच. निमगडे यांनी केले तर आभार क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी ए.आर. शिवणकर, आर.के. लाडे, छाया घुटके, नोडल अधिकारी आर.टी. निंबोळकर, प्रमोद वरगंटीवार, सुधीर शेंडे, वासुदेव कोडापे, जे.आर. मडावी, एस.टी. अलाम, एस.एम. दब्बा, पी.एल. कन्नाके, शोभा गेडाम, नीलू उसेंडी, एस.जी. गौरकार, वंदना महले, एन.के. वंजारी, आर.एम. दोनाडकर, पी.एस. गिरी, बी.एम. कटरे, के.एस. जावळे, लुंबिनी शंभरकर, एन.एम. मोटघरे, व्ही.जी. चाचरकर, महेश कुमरे, रूपेश नाईक, ओम राठोड, सतीश पवार, प्रेमिला दहागावकर, सी.सी. कोरचा, सुधीर झंझाळ, निर्मला हेडो, ए.एस. बहिरवार, व्ही.डी. विरूटकर, मंगेश ब्राह्मणकर, विनोद चलाख, के.एस. तुमसरे, मैंद, हजारे, ठाकरे, बावनथडे, गंडे आदींनी सहकार्य केले.यावेळी प्रकल्पातील कर्मचारी आश्रमशाळांचे क्रीडा शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.एक हजार विद्यार्थी दाखविणार कौशल्यएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर आयोजित तीन दिवसीय क्रीडा संमेलनात गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय व १८ अनुदानित अशा एकूण ४२ आश्रमशाळेतील सुमारे एक हजार विद्यार्थी खेळाडू आपले कौशल्य दाखविणार आहेत. प्रकल्पाअंतर्गत कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचे येथे सांघिक व वैयक्तिक खेळ घेण्यात येणार आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमातूनही आश्रमशाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी आपले कलागुण प्रदर्शीत करणार आहेत.
सोनसरीत क्रीडा संमेलनाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:30 AM
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन बुधवारी थाटात पार पडले.
ठळक मुद्देप्रकल्पातील ४२ आश्रमशाळांचा सहभाग : खेळाडूंनी नावलौकिक वाढविण्याचे इटनकर यांचे आवाहन