डाॅ. खुणे यांनी झाडीपट्टी रंगभूमीवर सुमारे ५ हजार नाटकांत ८०० प्रकारच्या विविध भूमिका साकारल्या आहेत. ते गुरूनोली गावाचे १५ वर्ष सरपंच आणि ५ वर्षे उपसरपंच हाेते. महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, कला वैभव पुरस्कार, झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार, स्वरराज छोटा गंधर्व नाट्य रंगकर्मी पुरस्कार, स्मिता स्मृती पुरस्कार, जादुगर पुरस्कार यासारखे अत्यंत मानाचे ३५ सन्मान त्यांना मिळालेले आहेत. आजवर त्यांनी तीन मराठी चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ते केंद्रीय फिल्म सेन्सर बोर्डवर सदस्य म्हणून तीन वर्षे कार्यरत होते. राजुरा येथे २००२ मध्ये भरलेल्या पहिल्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत.
राष्ट्रसंत साहित्य परिषदेतर्फे डाॅ. परशुराम खुणे सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:24 AM