लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया तत्काळ राबवावी या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील शिक्षकांनी १३ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले. २२ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. सदर आंदोलन २३ नोव्हेंबर रोजी तूर्तास मागे घेण्यात आले.यावर्षीपासून शासनाने शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. बदल्या आॅनलाईन करण्यासाठी शिक्षकांकडून माहिती मागविण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. वर्षानुवर्षे दुर्गम व नक्षलग्रस्त भागात काम करणाºया शिक्षकांची बदली होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शासन बदलीची प्रक्रिया राबविण्यास टाळाटाळ करीत आहेत. बदल्यांची प्रक्रिया तत्काळ राबवावी, यासाठी दुर्गम भागातील शिक्षकांनी आंदोलन सुरू केले होते. २३ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी ओ. बी. गुढे, उपशिक्षणाधिकारी चलाख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समया पसुला यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. शिक्षणाधिकारी गुढे यांनी बदल्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे लवकरच बदल्या होतील, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर दुर्गम भागात राज्य समन्वय समितीने उपोषण मागे घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी उपोषण मागे घेण्यात आले आहे. एक महिन्याच्या आत बदल्यांची प्रक्रिया सुरू न झाल्यास पुन्हा उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दुर्गम भागातील शिक्षकांनी दिला आहे. शिक्षणाधिकारी गुढे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजले. मागील ११ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता झाली.पुरोगामी संघटनेचा पाठिंबाया आंदोलनाला पुरोगामी शिक्षक समितीचे विदर्भ विभागीय अध्यक्ष राजेश दरेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विजय भोगेकर, जीवन भोयर यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला. इतरही संघटनांनी पाठिंबा दिला.
शिक्षकांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:19 AM
शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया तत्काळ राबवावी या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील शिक्षकांनी १३ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले. २२ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली होती.
ठळक मुद्देशिक्षणाधिकाºयांशी चर्चा : बदल्यांसाठी पाठपुराव्याचे आश्वासन