शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
2
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
3
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
4
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
5
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
6
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
8
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
9
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
10
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
11
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
12
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
13
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
14
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
15
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
16
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
17
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
18
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
19
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
20
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."

लाडक्या बहिणीला दीड हजार मिळाले; मोफत गॅस सिलिंडर कधी मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 1:55 PM

लाभार्थ्यांना प्रतीक्षा : दोन महिन्यांच्या अर्थसाहाय्यापासून ५० हजारांवर महिला वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : " 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना दीड हजार आणि वर्षाला तीन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. 

या घोषणेला महिनाभराचा कालावधी उलटला; परंतु अजूनपर्यंत योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे 'लाडक्या बहिणीं'ना लाभाची प्रतीक्षाच आहे. गरीब व गरजू महिलांचे सक्षमीकरण व्हावे, तसेच त्यांना आरोग्य जपण्यासाठी आर्थिक साहाय्य लाभावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना लागू केली. जुलै व ऑगस्ट महिन्याचे अर्थसाहाय्य महिलांच्या बँक खात्यात वळते करण्यात आले; परंतु त्यानंतर घोषणा केलेल्या मोफत सिलिंडरचा लाभ अजूनपर्यंत महिलांना देण्यात आलेला नाही. 

सदर लाभ कधी मिळणार, याची प्रतीक्षा जिल्हाभरातील लाभार्थी महिलांना आहे. अनेक नागरिक गॅस एजन्सीत सिलिंडरबाबत चौकशी करीत आहेत. शासनाने लवकर मोफत सिलिंडर योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महिलांनी केली. 

लाडकी बहीण' योजनेचे पावणेदोन लाख लाभार्थी जिल्ह्यात लाडकी बहीण' योजनेचे पावणेदोन लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांपैकी अजूनपर्यंत ५० हजारांवर लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळालेला नाही.

लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजारमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे लाभाचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत दोन महिन्यांचा लाभ महिलांना थेट बैंक खात्यात वितरित करण्यात आलेला आहे.

वर्षाला तीन सिलिंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत महिलांना दर वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेमुळे महिलांना गॅस सिलिंडरवर होणारा खर्च बचत करता येईल. ग्रामीण भागातील बहुतांश महिलांकडे गॅस सिलिंडर आहेत. उज्वला योजनेतून सदर सिलिंडर प्राप्त झाले. काही सिलिंडर वन विभागाच्या योजनेतून मिळालेले आहेत. 

"तीन सिलिंडर मोफत सिलिंडर मोफत देण्याबाबत अजूनपर्यंत निर्देश प्राप्त झालेले नाहीत. आरमोरी तालुक्यात उज्ज्वला योजनेचे १३ हजार ५९६ तर अन्य महिलांच्या नावे ४ हजार ३०० असे एकूण १७ हजार ८९६ कनेक्शन आहेत." - प्रदीप हजारे, गॅस एजन्सीचालक, आरमोरी

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली