आरमाेरी : तालुक्यातील अनेक शेतकरी सिंचनाच्या माध्यमातून उन्हाळी धानाचे उत्पन्न घेत आहेत. आरमाेरी शहरातील प्रगतिशील शेतकरी वसंतराव शेबे हे अनेक वर्षांपासून श्री पद्धतीने संकरित धानाची लागवड करून भरघाेस उत्पादन घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा संकरित पद्धतीने धानाची लागवड करून भरघाेस उत्पन्न घ्यावे, असा सल्ला शेतकरी शेबे यांनी दिला आहे. बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड करतात. त्यामुळे त्यांना आवश्यक प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. खरीप, रबी हंगामातील धानासह कडधान्य व भाजीपाला वर्गीय पिकाचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना बऱ्या प्रमाणात लाभ मिळताे. यंदाही आपण संकरित धानाची लागवड केली हाेती. त्यामुळे एकरी ३५ पाेते उत्पादन मिळाले, असेही शेबे यांनी सांगितले. १९९८ व २०१० मध्ये शासनातर्फे उत्कृष्ट व प्रगतिशील शेतकरी म्हणून शेबे यांचा गाैरव झाला आहे.
बाॅक्स
राेगांवर नियंत्रणास मदत
संकरित धान शेती कसताना पिकांवर राेगाचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव हाेईल याबाबत खबरदारी घेतली जाते. त्यानुसार धान राेपांची लागवड करताना विशिष्ट अंतर ठेवले जाते. त्यामुळे राेपांना फुटवे आल्यानंतरही पीक दाट हाेत नाही. परिणामी, पिकांवर राेगाचा प्रादुर्भाव हाेत नाही. राेगांना पिकापासून दूर ठेवण्याचे काम या पद्धतीमुळे करता येते.